भारत आणि जपान या देशांच्या लष्करी जवानांमधील संयुक्त मिलिटरी कसरती बेळगावात होणार आहेत. 27 फेब्रुवारी ते 12 मार्च या दरम्यान या कसरती होणार असून या माध्यमातून भारत आणि जपान या देशांमध्ये लष्करी प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव ला आहे. या माध्यमातून जपानचे जवान बेळगावच्या मातीत येणार असून या ठिकाणी भारत आणि जपान चे सैनिक एकत्रितरित्या कसरती करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर योग्य ती व्यवस्था करण्यात आली असून फेब्रुवारी महिन्याच्या २७ तारखेपासून १२ मार्च पर्यंत बेळगाव शहर येथील मराठा लाईट इन्फंट्री चे केंद्र याच बरोबर ईतर अनेक ठिकाणी त्या कसरती होणार आहेत. याबद्दलची माहिती लष्करी अधिकाऱ्यांकडून उपलब्ध झाली असून जपान येथील पाच जणांचे अधिकारी पथक नुकतेच बेळगावला येऊन गेले आहे .
या संदर्भातील योग्य ते नियोजन करण्यात आले असून धर्मा गार्डियन या नावाने हे शिबिर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी अमेरिका व चीन या सारख्या देशांच्या लष्करी जवानांना मराठामध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे.
त्याचबरोबर संयुक्तरित्या कसरतीही करण्यात आल्या आहेत. यावेळी जपानचे सैनिक भारतात दाखल होणार असल्यामुळे शिवाय बेळगावात त्यांचे प्रशिक्षण होणार असल्यामुळे भारतीय लष्करी दलाला अद्ययावत लष्करी यंत्रणांची माहिती आणि त्या हाताळण्याची संधी उपलब्ध होणार असून भारतीय युद्धनीती चे शिक्षण जपानी सैनीकांना मिळणार आहे.