हेस्कॉम कडून दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील काही भागाचा वीजपुरवठा येत्या दिनांक 27 28 30 व 31 डिसेंबर रोजी रोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खंडित केला जाणार आहे.
हेस्कॉनतर्फे 27 डिसेंबर पासून 28, 30 आणि 31 रोजी एफ-11, एफ-8, एफ-3 आणि एफ- 14 फिडर वरील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. वीज पुरवठा खंडित केल्या जाणाऱ्या भागांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
शुक्रवारी 27 रोजी एफ-11 सुभाष मार्केट फिडर: सुभाष मार्केट, हिंदवाडी, आयएमईआर कॉलेज रोड, घुमटमाळ, आनंदवाडी, आरपीडी दुसरा क्राॅस, कंकणवाडी कॉलेज रोड, रानडे कॉलनी, आर. के. मार्ग आदी परिसर.
शनिवार 28 रोजी एफ- 8 शहापुर फिडर: खडेबाजार, न्यू गूडशेड रोड, शास्त्रीनगर, एसपीएम रोड, महात्मा फुले रोड, हुलबत्ते कॉलनी, कचेरी गल्ली, मठ गल्ली, एसपीएम रोड, कपलेश्वर रोड, संतसेना रोड शहापूर परिसरातील सर्व भाग.
सोमवार दि. 30 रोजी एफ- 3 हिंदवाडी फिडर: सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, खानापूर रोड, सराफ कॉलनी, मिलेनियम गार्डन रोड, इन्द्रप्रसादनगर, आरपीडी कॉलेज, ओल्ड गूडशेड रोड आदी भाग.
मंगळवार दि. 31 रोजी एफ-14 फिडर: संभाजीनगर, येरमाळा रोड, आदर्शनगर रोड, अन्नपूर्णेश्वरीनगर, गाडेमार्ग, रणझुंजार कॉलनी, आनंदनगर, केशवनगर, समृद्धी कॉलनी, पटवर्धन लेआउट आदी भाग.
तरी संबंधित भागातील नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेच हेस्कॉमने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे



