Friday, April 19, 2024

/

चिंचली श्री मायाक्का मंदिर सूर्यग्रहणातही खुले

 belgaum

चिंचली शसूर्यग्रहणाचा सर्व मंदिरांवर परिणाम होतो असे मानले जात असलेतरी चिंचली (ता. रायबाग) येथील श्री मायाक्का देवीचे मंदिर याला अपवाद आहे. चिंचलीची शक्तिदेवता श्री मायाक्का मंदिर गुरुवारी सुर्यग्रहणावेळीही खुलेच होते.

ग्रहणांच्यावेळी साधारणपणे सर्व देवदेवतांची मंदिरे बंद ठेवण्यात येतात. चिंचोली येथील जागृत देवस्थान श्री मायाक्का देवी मंदिर मात्र याला अपवाद असून या मंदिराची प्रथा इतरांपेक्षा वेगळी आहे. हे मंदिर ग्रहणा दिवशीही भाविकांसाठी खुले ठेवण्यात येते. गुरुवारी सूर्यग्रहणा दिवशी देखील शक्तिदेवता श्री मायाक्का देवीचे मंदिर खुले असल्याने नेहमी प्रमाणे या ठिकाणी भाविकांची गर्दी होती.

कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि अन्य ठिकाणच्या भक्तांनी चिंचली मायाक्काचे दर्शन घेतले. अंधारातही देवीमाता प्रकाश दाखवते, असे भक्त श्रद्धेने सांगतात. .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.