Thursday, April 25, 2024

/

रोहिनी तेंडुलकर यांचे जाहीर आभार, अधिक मदतीचे आवाहन

 belgaum

बेळगावच्या वेणुग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या औदुंबर तेंडुलकर या हलाखीची परिस्थिती असलेल्या रुग्णाला उपचारासाठी अद्यापपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून 2 लाख 37 हजार 476 रुपयांची मदत मिळाली आहे. याबद्दल औदुंबरची आई रोहिणी यांनी मदत करणाऱ्या सर्वांचे जाहीर आभार मानून अधिक मदतीची याचना केली आहे.
.
मुंबई येथे गेल्या 1 ऑगस्ट रोजी अपघातात गंभीर जखमी झालेल्या औदुंबर चंद्रकांत तेंडुलकर (वय 31) या रुग्णावर गेल्या 12 सप्टेंबरपासून बेळगावच्या वेणुग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रोहिणी तेंडुलकर यांचा औदुंबर हा एकुलता एक मुलगा असून त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. इतर कोणी नातेवाईक नसल्यामुळे रोहिणी यांना 24 तास अंथरूणाला खिळून असलेल्या मुलाच्या देखभालीसाठी हॉस्पिटलमध्ये थांबावे लागते. तेंव्हा मदत मिळविण्यासाठी त्या बाहेर फिरूही शकत नाहीत. हॉस्पिटलमधील मुलाचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी स्वतःचे घर देखील विकले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून औदुंबर याच्या उपचारासाठी आतापर्यंत 2 लाख 37 हजार 476 रुपयांची मदत मिळाली आहे. मात्र अद्यापही 96 हजार 473 रुपये इतका उपचारचा खर्च द्यावयाचा आहे. रुग्ण अजूनही पूर्णपणे बरा झाला नसल्याने त्याला हॉस्पिटलमध्येच राहावे लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे यासाठी रोहिणी तेंडुलकर यांनी मदतीचे आवाहन केले आहे.

तरी दानशूर व्यक्तींसह सेवाभावी संस्थांनी औदुंबरच्या मदतीसाठी रोहिणी तेंडुलकर यांच्या बँक खात्यावर आपली आर्थिक मदत जमा करावी. बँक खात्याचा क्रमांक पुढील प्रमाणे आहे. A/c no:10226856664, ifsc: sbin0002217, bank: state bank of India, branch: industrial estate, udymbag. संपर्क क्र.: 7026723434.

 belgaum

https://m.facebook.com/story.php?story_fbid=994881690869424&id=375504746140458

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.