belgaum

दुर्गामाता मिरवणुकीत भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, दहाहून अधिक जखमी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: दसऱ्याच्या निमित्त दुर्गादेवीची मूर्ती मिरवणुकीतून घेऊन जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने मिरवणुकीतील भाविकांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण जखमी झाले. ही घटना रविवारी हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती आणि हत्तरगी टोलनाक्याजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हुंच्यानट्टी गावाकडे दुर्गामाता मुर्ती बेळगाव हुन आणलेली दुर्गादेवीची मूर्ती पुन्हा मिरवणुकीने हुंच्यानट्टी गावाकडे घेऊन जात असताना हा अपघात घडला. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने मिरवणुकीतील भाविकांना धडक दिली. या धडकेत अनेक जण गंभीर जखमी झाले.

 belgaum

या भीषण अपघातात प्रकाश, महेश आणि दानेश्वरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींना तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला असून, याप्रकरणी अधिक तपशील मिळण्याची प्रतीक्षा आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.