कांही वर्षांपूर्वी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगावातील आई आणि तिच्या दोन मुलांच्या हत्याकांडातील आरोपी प्रवीण भट्ट याला उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने निर्दोष ठरविले आहे.
बेळगावच्या द्वितीय जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचा दिलेला आदेश उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने फेटाळून लावला आहे. थोडक्यात न्यायाधीश के. एस. मुदगल व न्यायाधीश एमजीएस कमल यांच्या खंडपीठाने आरोपी निर्दोष असल्याचा निर्णय दिला आहे.
तिहेरी खून प्रकरणी 2018 साली प्रवीण भट याला बेळगाव न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शहरातील कुवेंपूनगर येथे 2015 -16 साली तिहेरी खुनाची घटना घडली होती. रीना मालगत्ती, आदित्य मालगत्ती आणि साहित्या मालगत्ती अशा तिघा जणांचा त्यावेळी भीषण खून झाला होता.
सदर घटनेनंतर अवघ्या 24 तासात एपीएमसी पोलीसांनी प्रवीण भट याला खून प्रकरणी गजाआड केले होते. आरोपी प्रवीण भट आणि रीना यांच्यातील अनैतिक संबंधातून तिहेरी खुनाचा प्रकार घडला होता.
अशी घडली होती आगष्ट 2015 साली घटना
बेळगाव शहरातील कुवेंपू नगर भागात रीना मालगती या ३७ वर्षीय विवाहिते गळा चिरून तर तिचा मुलगा आदित्य आणि मुलगी आयेशा यांचा बादलीत बुडवून आणि गळा दाबून निर्घुन खून झाल्याने संपूर्ण बेळगाव शहर हादरवून गेले होते . मयत रीनाचे कुवेंपू नगर मधील त्यांच्या घरच्या शेजारी राहणाऱ्या प्रवीण भट्ट नावाच्या २३ वर्षीय महा विद्यालयीन सुत जुळले होते
प्रवीण याने रिनाच्या घरी टेरेस मार्गा द्वारे प्रवेश करत रीना आपले अनैतिक संबध संपवूया असे सांगितले यावेळी रीना ने संबंध तोडायला नकार दिला यावेळी रीना आणि प्रवीण मध्ये भांडण झाले प्रवीण ने रागाच्या भारात रीना च्या गळ्यावर चाकूचा वार केला त्यात रीना जा जागीच मृत्यू झाला भांडणाचा आवाज पाहून रीना ची बाजूला झोपलेली आदित्य आणि आयेशा हि दोन मुल जाग झाली प्रवीण ने पहिला आयेशा ला बाथ रूम मध्ये नेउन पाण्याच्या बादलीत बुडवून तर आदित्य चा दोरीने गळा दाबून खून केला या घटनेने या भागात एकच खळबळ माजली होती .