20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 9, 2022

‘आईच्या सन्मानासाठी 27 तारखेला रस्त्यावर उतरु’: संतोष मंडलिक

मराठी आमचा श्वास आहे मराठी आमचा ध्यास आहे मराठी टिकलीच पाहिजे यासाठी आमचा अट्टहास आहे.आम्ही सीमावासीय सगळे जण मराठी आईची लेकरं आहोत यासाठी आपण 27 तारखेला रस्त्यावर उतरणार आहोत ते आपल्या आईच्या सन्मानासाठी..असे मत तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा...

नभ मेघांनी आक्रमिले जलद भरून आले….

बेळगावातल वातावरण आज मान्सूनच्या आगमनामुळे कुंद होऊन गेलंय, भरलेलं आभाळ काळाकुट्ट झालेला परिसर आणि एक प्रकारची मंद मंद सोड पसरलेले हवा त्यामुळे मानसून सूचक आगमन दिसून येत होते. मान्सून खात्याच्या अंदाजानुसार आगामी 48 तासांमध्ये महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे तर...

भाजपच्या विजयासाठी ‘सरनोबतांचा’ झंझावाती प्रचार

विधानपरिषद निवडणुकीसाठी कर्नाटक वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार अरुण शहापूर आणि हणमंत निराणी यांच्या प्रचारार्थ भाजप ग्रामीण महिला मोर्चाच्या नेत्या डाॅ. सोनाली सरनोबत यांनी आज खानापूर तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा केला. भाजप नेत्या डाॅ. सोनाली सरनोबत या सध्या...

कॅन्टोन्मेंट भागातील 936 झाडांवर कोसळणार कुर्‍हाड

शहराच्या कॅन्टोनमेंट विभागातील विविध ठिकाणची सुमारे 250 झाडे यापूर्वीच तोडण्यात आलेली असताना आता नव्याने 936 झाडे तोडण्यास बेळगाव वन खात्याने परवानगी दिली आहे. निसर्गसंपन्न अशा कॅन्टोन्मेंट विभागातील झाडांची कत्तल केली जाऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक शंकर पाटील यांचे प्रयत्न...

एस. श्रीधर बनले एअरमन ट्रेनिंग स्कूलचे नूतन स्टेशन कमांडर

सांबरा, बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलचे नूतन स्टेशन कमांडर म्हणून एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे आज गुरुवारी आयोजित कार्यक्रमात मावळते स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन अरुण मुत्तू यांनी आपल्याकडील अधिकार...

विद्यार्थिनीचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या शिक्षकाची धुलाई

विद्यार्थिनीशी लैंगिक संबंध ठेवून तिचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थांनी चांगलाच चोप देऊन धुलाई केल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील यक्कुंडी या गावामध्ये घडली. यक्कुंडी (ता. सौंदत्ती, जि. बेळगाव) गावातील माध्यमिक शाळेच्या शारीरिक शिक्षक महेश शिवलिंगप्पा बिरादार याने शाळेतील एका विद्यार्थिनीला...

निसर्गाचा चमत्कार… एकाच झाडाला विभिन्न रंगाची फुले

चमत्कारी निसर्गाचा प्रत्यंतर आपल्याला वेळोवेळी येत असतो आणि बरेचदा हा चमत्कार थक्क करणारा असतो. असा चमत्कार शहरातील एका पांढऱ्या जास्वंदीच्या फुल झाडाच्या बाबतीत घडला असून या झाडाला चक्क पांढरे व गुलाबी रंगाचे जास्वंदीचे फूल उमलले आहे. हा चमत्कार बेळगावातील ज्येष्ठ...

दिव्यांगाच्या घराचे स्वप्न साकार

दोन वर्षांपूर्वी महापुरात घर वाहून गेले... शासनाने नवीन घर मंजूर करत दोन हप्ते देखील दिले. परंतु, तिसर्‍या हप्त्यासाठी दोन वर्षांपासून हेलपाटे मारूनही अधिकार्‍यांना पाझर फुटला नाही. शेवटी वैतागलेल्या या गरीब शेतकर्‍याने कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांची भेट घेऊन कहाणी...

शैक्षणिक शुल्क, डोनेशन विरोधात अभाविपचे आंदोलन

बेळगाव शहरातील शाळा महाविद्यालयांमधील भरमसाठ शैक्षणिक शुल्क आणि डोनेशनच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आज गुरुवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे जोरदार निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. शहरातील बहुतांश खाजगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सध्या अव्वाच्यासव्वा शैक्षणिक शुल्क...

कित्तूरमध्ये होणार अन्न प्रक्रिया प्रकल्प : मंत्री निराणी

जगप्रसिद्ध संजय घोडावत ग्रुप लवकरच कित्तूर औद्योगिक वसाहतीमध्ये अन्न प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार असून यामुळे 500 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती औद्योगिक मंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली. विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या समवेत...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !