Tuesday, July 23, 2024

/

भाजपच्या विजयासाठी ‘सरनोबतांचा’ झंझावाती प्रचार

 belgaum

विधानपरिषद निवडणुकीसाठी कर्नाटक वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार अरुण शहापूर आणि हणमंत निराणी यांच्या प्रचारार्थ भाजप ग्रामीण महिला मोर्चाच्या नेत्या डाॅ. सोनाली सरनोबत यांनी आज खानापूर तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा केला.

भाजप नेत्या डाॅ. सोनाली सरनोबत या सध्या विधान परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी झटत आहेत.

डाॅ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते रमेश पाटील, सेवानिवृत्त शिक्षक बेदरे, उंदरे मॅडम आदींनी आज गुरुवारी खानापूर तालुक्यातील करंबळ, कारलगा, बेकवाड व नंदगड भागाचा दौरा करून विधान परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवार अरुण शहापूर आणि हणमंत निराणी यांचा जोरदार प्रचार केला.Bjp khanapur

कन्या विद्यालय नंदगड, आनंदगड विद्यालय नंदगड, बेकवाड हायस्कूल, मराठा मंडळ करंबळी हायस्कूल, कारलगा हायस्कूल आदी शाळांना भेटी देऊन डॉ. सरनोबत यांनी शिक्षक आणि पदवीधरांना भाजप उमेदवारांनाच निवडून आणण्याची विनंती केली.

त्यावेळी उपस्थित शिक्षक आणि पदवीधरांनी देखील भाजप उमेदवारांना आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.