मराठी कागदपत्रांची मागणी करून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोरखेळ करत आहे. ही अर्थहीन मागणी कधीही मान्य होणार नाही. कन्नड भाषाच आमची अधिकृत आहे. त्यामुळे समाजात दुही पसरवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे, त्यांच्यावर कारवाई करू, अशी दर्पोक्ती जिल्हा पालकमंत्री गोविंद...
स्मशानाकडे जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्यात यावा या आपल्या मागणीकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त ग्रामस्थांनी चक्क अंत्यविधीसाठी नेण्यात येणारा मृतदेहच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवून आंदोलन छेडल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली.
सौंदत्ती तालुक्यातील ऐणगी गावातील हिंदू आणि मुस्लिम स्मशानभूमीकडे...
बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन 8 महिने उलटून गेले तरी अद्याप महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रभागांमधील कोणतीही कामे होत नाही आहेत. तेंव्हा बेळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक तात्काळ घेण्यात यावी अशी मागणी 15 हून अधिक नगरसेवकांनी केली...
सरकारी परिपत्रके मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत या आमच्या मागणीची येत्या आठ दिवसात पूर्तता न झाल्यास सातत्याने आंदोलन छेडली जातील आणि त्यामुळे बेळगाव शहरात जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार राहील, असा...
बेळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या बदलीचा आदेश राज्य सरकारने बजावला आहे. राज्यातील 16 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश राजकारण सरकारने बजावला असून त्यात बेळगाव जिल्ह्याचे एसपी लक्ष्मण निंबरगी यांचादेखील समावेश आहे
आय पी एस अधिकारी संजीव एम पाटील...
बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांचे मूलभूत हक्क आणि घटनेने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना सरकारी कागदपत्रे -परिपत्रके तात्काळ मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत अन्यथा बेळगाव आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मूलभूत हक्काची पायमल्ली होत असल्याच्या निषेधार्थ आम्हाला उग्र आंदोलन...
गोवावेस येथील महापालिकेच्या व्यापारी संकुलाची इमारत धोकादायक बनल्याने तेथील ईएसआय क्लिनिक आता खाऊ कट्टा समोरील आदिशक्ती इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पुढील कांही वर्षे याच इमारतीत हे क्लिनिक सुरू राहणार असून ईएसआय संबंधित कामगारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन...
दोन आठवड्यांपूर्वी जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर त्यात भर म्हणून आता विविध न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
जारी करण्यात आलेल्या सदर आदेशानुसार बेळगाव द्वितीय अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पवनेश डी. यांची प्रथम अतिरिक्त...
मराठी भाषिकांना त्यांच्या भाषिक अधिकारापासून डावलले जात असल्याच्या निषेधार्थ तसेच सरकारी कागदपत्रे मराठीतून मिळावीत या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो मराठी भाषिकांचा भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. आजच्या मोर्चाने पुन्हा...