20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 19, 2022

भाषेसाठी अस्तित्व टिकवा अन अस्तित्व टिकवण्यासाठी मोर्चा यशस्वी करा:मंडलिक

कोणताही धर्म टिकवायचा असेल तर संस्कृती टिकली पाहिजे, संस्कृती टिकवायची असेल तर भाषा टिकली पाहिजे आणि भाषा टिकवायची असेल तर आपलं अस्तित्व टिकवायला पाहिजे. हेच अस्तित्व टिकवण्यासाठी 27 रोजीच्या मराठी परिपत्रकाचा मोर्चात हजारोंच्या संख्येने मराठी जनतेने सहभागी व्हावे असे...

..अन् चोर्ला घाटात प्रवाशांनीच हटविला कोसळलेला वृक्ष

बेळगाव आणि गोव्याला जोडणाऱ्या चोर्ला घाटातील रस्त्यावर उन्मळून पडलेला मोठा वृक्ष प्रवाशांनीच श्रमदानाने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केल्याची घटना आज रविवारी दुपारी घडली. चोर्ला घाटामध्ये आज सकाळी रस्त्या शेजारील एक मोठा वृक्ष अचानक उन्मळून रस्त्यावर कोसळला. परिणामी बेळगाव -गोवा मार्गावरील...

शांतता भंग करणाऱ्यांची गय नाही -पोलीस आयुक्त

अग्नीपथ योजनेच्या निषेधार्थ बेळगावात उद्या पुकारण्यात येणाऱ्या बंदला कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही. परवानगी नसताना निदर्शने आणि आंदोलने केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेच्या...

25 वर्षांनी दिला ‘बालपणीच्या आठवणीना उजाळा’

सांबरा (ता. जि. बेळगाव) येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता सातवीच्या 1996 -97 सालातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि गुरुजनांचा आदर सोहळा काल शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेच्या सभागृहामध्ये आयोजित सदर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी 1997 सालच्या सातवीतील विद्यार्थ्यांच्या वर्गशिक्षिका...

भारतनगरात कर्जबाजारी विणकराची आत्महत्या

बँकेकडून घेतलेले कर्ज फेडता न आल्याने कर्जबाजारी झालेल्या विणकराने जीवनाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शहरातील भारतनगर येथे आज रविवारी उघडकीस आली. कल्लाप्पा रुद्राप्पा सोनटक्के उर्फ कुकडोळी (वय 58, रा. भारतनगर, हमाल वाडी बेळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या विणकराचे नांव आहे. स्वतःचे...

शहराच्या मास्टर प्लॅनसाठी आता नवा ठेका?

सध्या ज्या ईजीआयएस या ठेकेदार कंपनीकडे बेळगाव शहराचा मास्टर प्लॅन (सीडीपी) तयार करण्याचा ठेका आहे. मात्र आता हा ठेका रद्द केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शहराचा नवा मला मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी नवा ठेकेदाराची नियुक्त करण्यात येणार...

गौंडवाड खून प्रकरणी सात तर जाळपोळ प्रकरणी 19 जण अटकेत

गौंडवाड (ता. जि. बेळगाव) गावातील देवस्थान जमिनीच्या वादातून गेल्या शनिवारी रात्री एकाचा खून होण्याबरोबरच गावात दंगल उफाळून जाळपोळ करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी खून प्रकरणी 7 जण, तर जाळपोळ प्रकरणी 19 जण अशा एकूण 26 जणांना गजाआड केले आहे....

एमएसस्सीत पल्लवी शेडबाळ चन्नम्मा विद्यापीठात तिसरी

मराठा मंडळ संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयातील एमएससी आणि एमकॉम पीजी सेंटरची विद्यार्थिनी पल्लवी तिपन्ना शेडबाळ हिने राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव येथे एमएससीमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे. बेळगावच्या इतिहासात या पद्धतीने चन्नम्मा विद्यापिठात एखाद्या विद्यार्थी विद्यार्थिनीने रँक मिळविण्याची...

युवकाच्या खुना नंतर गौंडवाडमध्ये तणाव जाळपोळ

देवस्थानच्या जागेच्या वादातून बेळगाव जवळील गौंडवाड युवकाचा खून झाल्यानंतर गावात शनिवारी रात्री दगडफेक, जाळपोळ केल्याची घटना घडली या घटनेने संपूर्ण गाव तणाव आणि दशहतीत आहे. जमावाने सुमारे 8 हून अधिक वाहने पेटविली असून गवत गंजींनाही आगी लावण्याचा प्रकार घडला...

दिगंबर पाटील समितीची ‘मध्यवर्ती समितीशी चर्चा’

खानापूर समितीतील दोन्ही गटात एकी व्हावी या दृष्टिकोनातून माजी आमदार दिगंबर पाटील गटाच्या शिष्टमंडळाने मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी एकी संदर्भात चर्चा केली.शनिवारी दुपारी बेळगावात ही बैठक झाली. मध्यवर्ती समितीच्या वतीने अध्यक्ष दीपक दळवी,माजी आमदार मनोहर किणेकर, वकील राजाभाऊ पाटील,प्रकाश मरगाळे आणि...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !