Daily Archives: Jun 14, 2022
राजकारण
लोकसभा पोटनिवडणुक पैशाची अफरातफर; पीआयएल दाखल करण्याचा इशारा’
बेळगाव लोकसभा निवडणूक खर्चासाठी सरकारने दिलेल्या पैशांमध्ये अफरातफर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आपण बेळगाव जिल्हा प्रशासना विरुद्ध न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा माहिती हक्क कार्यकर्ता भीमप्पा गडाद यांनी दिला आहे.
प्रसिद्धीमाध्यमांना जारी केलेल्या आपल्या एका...
बातम्या
बेपत्ता मेजरच्या तपासासाठी विशेष पथक कार्यरत
बेळगाव शहरामधून गुढरित्या बेपत्ता झालेले कमांडो विंगचे सुभेदार मेजर सुरजीत सिंग एच. यांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
एमएलआयआरसीच्या कमांडो विंगमध्ये सेवा बजावणारे सुभेदार मेजर सुरजित सिंग एच.(वय...
बातम्या
‘ यासाठी हमारा देश’तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बेळगावातील फोर्ट रोडवर भर रस्त्यात भाजप नेत्या नूपुर शर्मा यांची फाशी दिलेल्या अवस्थेतील प्रतिकृती विजेच्या तारेवर टांगणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हमारा देश संघटनेने केली आहे.
हमारा देश संघटनेतर्फे आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना...
बातम्या
मराठी भाषिक वकीलांची कै. ॲड. मुकुंद परब यांना श्रद्धांजली
बेळगाव मराठी भाषिक वकील संघटनेचे पहिले अध्यक्ष कै. मुकुंद परब यांची शोक सभा चव्हाट गल्ली येथील श्री जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये नुकतीच गांभीर्याने पार पडली
शोक सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड. पी. एम. टपालवाले हे होते. प्रारंभी दिवंगत मुकुंद परब यांना दोन...
विशेष
*ह्योच नवरा पायजे….*
बेळगाव शहर आणि परिसरात सुवासिनी महिलांनी वट पौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली.बेळगाव शहर परिसर उपनगरात ज्या ज्या ठिकाणी वडाचे झाडे आहेत त्या ठिकाणी सकाळ पासूनच महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी गर्दी केली होती.आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभो आणि सात जन्मात...
बातम्या
तोतया एसीबी अधिकारी सायबर पोलिसांच्या जाळ्यात
शासकीय अधिकाऱ्यांना फोन करून अकाउंट मध्ये पैसे घाला अशी भीती दाखवूत लाखो रुपये उकळणाऱ्या तिघा तोतया एसीबी अधिकाऱ्यांच्या टोळीला बेळगाव सायबर क्राईम पोलिसांनी जेरबंद केले आहे.
बेळगाव जिल्ह्यासह आजूबाजूच्या इतर जिल्ह्यामध्ये 'आपण एसीबीचे अधिकारी आहोत असे भासवून पैसे वसुलणाऱ्या मुरगाप्पा निंगाप्पा...
बातम्या
न्यायालयाने फेटाळली स्थगिती उठवण्याची मागणी
हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामावरील स्थगिती आदेश उठवावा अशी अर्जाद्वारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हा दिवाणी न्यायालयाकडे केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याबाबत पुढील सुनावणी येत्या 27 जून रोजी होणार आहे.
हालगा -मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात न्यायालयाने यापूर्वी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व...
बातम्या
सरकारच्या निषेधार्थ वकिलांचा कामकाजावर बहिष्कार
बेळगाव येथे कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ स्थापण्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनतर्फे आज मंगळवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाने निवेदन सादर करण्यात आले.
बेळगावात कर्नाटक राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाचे खंडपीठ आपल्याकडे...
बातम्या
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा शिवसेनेने मागणी
मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने एका वानरावर हल्ला करून त्या वानराला अक्षरशः फाडून खाल्ले. आदर्श नगर वडगाव येथील मेघदूत कॉलनी येथे असणाऱ्या उद्याना नजीक भटक्या कुत्र्यांनी वानरावर हल्ला केला आणि त्या वानराच्या छाती आणि पोटाकडील भागाचे लचके तोडले.
याआधीही बेळगाव शहर, उपनगरं...
बातम्या
कुत्र्याने ठार केलेल्या माकडावर अंत्यसंस्कार
बेळगाव शहरात अलिकडे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धोकादायक बनत चाललेल्या या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या माकडावर सामाजिक कार्यकर्त्यांनी शहापूर स्मशानानजीक अंतिम विधी केला.
आदर्शनगर वडगाव येथील मेघदूत कॉलनी उद्यानाजवळ भटक्या कुत्र्यांनी एका माकडावर जोरदार हल्ला करून...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...