Thursday, April 25, 2024

/

मराठी भाषिक वकीलांची कै. ॲड. मुकुंद परब यांना श्रद्धांजली

 belgaum

बेळगाव मराठी भाषिक वकील संघटनेचे पहिले अध्यक्ष कै. मुकुंद परब यांची शोक सभा चव्हाट गल्ली येथील श्री जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये नुकतीच गांभीर्याने पार पडली

शोक सभेच्या अध्यक्षस्थानी ॲड. पी. एम. टपालवाले हे होते. प्रारंभी दिवंगत मुकुंद परब यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी बोलताना ॲड. बालमुकुंद राणे म्हणाले की मित्र असावा तर अजात शत्रू कै. मुकुंद परब यांच्या सारखा असावा.

त्यांच्यासोबत मी गेली चाळीस वर्षे राहिलो. त्यांच्या जीवनात अनेक चढ-उतार आले. मात्र त्यांनी सर्व अडचणींवर मात केली. ते नेहमी सर्वांना सढळ हस्ते मदत करीत असत. ॲड. श्रीपाल कळ्ळीमणी यांनी कै. मुकुंद परब हे एक उत्तम सल्लागार होते. सहकार क्षेत्र असो, बँकिंग क्षेत्र असो अथवा इतर सामाजिक अडचणी असोत त्यांच्यावर योग्य तो सल्ला ते देत असत असे सांगितले.

 belgaum

ॲड. दिलीप सिद्धांते यांनी कै. मुकुंद परब हे गरीब गरजू लोकांना, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत असत, पण त्याची वाच्यता त्यांनी कधीच केले नाही असे सांगितले. ॲड. राजहंस यांनी कै. ॲड. परब म्हणजे चालते बोलते मार्गदर्शक, मितभाषी सर्वांना समजून घेणारे व्यक्तिमत्त्व होते.Advocate tributes

त्यामुळे सर्व जातीधर्मांतील लोकांशी त्यांचे आपुलकीचे नाते होते, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात ॲड. टपालवाले म्हणाले की, मराठी भाषिक वकील संघटना स्थापण्यामध्ये कै. मुकुंद परब यांचा सिंहाचा वाटा होता. मराठी भाषिक वकील संघटना ही मराठी भाषिक वकिलांना मार्गदर्शक ठरावी. मराठी वकीलांच्या अडचणी सोडविण्यासाठी ही संघटना म्हणजे एक व्यासपीठ ठरावे अशा मताचे कै. मुकुंद परब कुशल संघटक होते. त्यांचे कार्य कधीही विसरण्यासारखे नाही असे म्हणाले.

सभेचे सूत्रसंचालन ॲड. सुधीर चव्हाण यांनी केले. त्यांनी कै. ॲड. परब यांच्या म. ए. समितीच्या कार्याची ओळख करून दिली. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंदे कार्यकर्ते होते. समितीच्या सर्व लढ्यांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यांचे त्याकाळचे बादशाही बोर्डिंग म्हणजे सर्व पुढारी मंडळींची व्यवस्था करण्याचे ठिकाण होते, असे ॲड. चव्हाण यांनी सांगितले.

शोकसभेला ॲड. विजय मोहिते, ॲड. अमर येळ्ळूरकर, ॲड. सतीश बांदिवडेकर, ॲड. अनिल सांबरेकर, ॲड. सोमनाथ जायण्णाचे, ॲड. एम. पाटील, ॲड. प्रसाद सडेकर, ॲड. पी. के. सिद्धांते, ॲड. दिवटे आदी बहुसंख्य वकील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.