Saturday, April 20, 2024

/

बेपत्ता मेजरच्या तपासासाठी विशेष पथक कार्यरत

 belgaum

बेळगाव शहरामधून गुढरित्या बेपत्ता झालेले कमांडो विंगचे सुभेदार मेजर सुरजीत सिंग एच. यांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

एमएलआयआरसीच्या कमांडो विंगमध्ये सेवा बजावणारे सुभेदार मेजर सुरजित सिंग एच.(वय 47) हे गेल्या शनिवारी सायंकाळपासून शहरातून बेपत्ता झाले आहेत.

ते गेल्या दहा वर्षापासून कमांडो विंग येथे ते प्रशिक्षक म्हणून सेवा बजावत होते. आर्मी कॅम्पमध्ये वास्तव्यास असलेले सुरजित सिंग बेपत्ता झाल्याची तक्रार कमांडो विंगच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प पोलीस स्थानकात नोंदविली आहे.Major surjeet

गेल्या शनिवारी सायंकाळी शहरात आपला मोबाईल दुरुस्त करण्यासाठी सायकलवरून आलेले सुभेदार मेजर सुरजित सिंग हे धर्मवीर संभाजी चौक येथील वैशाली रेस्टॉरन्ट आणि बार या ठिकाणी आपली सायकल स्टॅंडवर लावताना सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये शेवटचे आढळून आले होते. त्यानंतर बेपत्ता झालेले सुरजित सिंग कुठे गेले याचा आतापर्यंत कांहीच पत्ता लागलेला नाही.

एक लष्करी अधिकारी शहरातून गुढरित्या बेपत्ता होण्याच्या या घटनेची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यासाठी पोलीस उपायुक्त पी. व्ही. नेहा यांच्या नेतृत्वाखाली सुभेदार मेजर सुरजीत सिंह यांच्या शोध घेण्यासाठी एका विशेष पोलीस तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या पथकाने आपले कार्य सुरू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.