ओळखपत्र नसताना मतमोजणी केंद्रात प्रवेश केलेल्या भाजप उमेदवार हनुमंत निराणी यांच्या एका निकटवर्तीयाला धारेवर धरून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी त्याला केंद्राबाहेर हाकलल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली.
शहरातील ज्योती कॉलेज येथील मतमोजणी केंद्रामध्ये विधान परिषदेच्या कर्नाटक वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीला हाफ बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून प्रारंभ झाला. त्यावेळी भाजप उमेदवार हनुमंत निराणी यांचा एक निकटवर्तीय केंद्रात दाखल झाला होता. मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवून असणाऱ्या जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी त्या निकटवर्ती याला जाब विचारला. तसेच त्याच्याकडे ओळखपत्र नसल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला ताकीद देऊन मतदान केंद्राबाहेर जाण्यास सांगितले.