कर्नाटक सरकारने येत्या 5 जुलैपासून साप्ताहिक लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार दर रविवारी संपूर्ण दिवस राज्यभरात लॉक डाऊन जारी असणार आहे. त्याचप्रमाणे उद्या सोमवार दि. 29 जून 2020 पासून दररोज सायंकाळी 8 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असणार आहे.
राज्यातील सरकारी कार्यालय यापुढे दर शनिवारी आणि रविवारी बंद असतील. याखेरीज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या दिवसांमध्ये कपात करण्यात आली आहे राज्य सरकारी कर्मचारी यापुढे आठवड्यातील फक्त पाच दिवस काम करतील.
तज्ञ समितीच्या निर्णयानुसार आता उद्या सोमवार दि. 29 जून पासून दररोज रात्री 8 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत संचार बंदी अर्थात कर्फ्यू जारी असणार आहे. रात्री याबाबत घोषणा होणार आहे.
Just in: Karnataka government has decided for a weekend lockdown from July 5th. Sunday would be a complete lockdown for the entire state.
From June 29th, 8 PM to 5 AM would be the curfew time.
Government offices to be shut on Saturdays and Sundays, henceforth.
— Eshwar Shetty (@EshwarShetty11) June 27, 2020