होनगा (ता. बेळगाव) येथील मराठी शाळेमध्ये इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन करण्यात आलेल्या मुंबई रिटर्न प्रवाशांना आज रविवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. या केंद्रात काॅरन्टाईन झालेल्या सर्व प्रवाशांनी त्यांची नाश्ता व जेवणखाण्याची आस्थेने व्यवस्था केल्याबद्दल केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांना धन्यवाद दिले आहेत.
होनगा (ता. बेळगाव) येथील मराठी शाळेमध्ये मुंबईसह विविध राज्यातून आलेल्या सुमारे 30 प्रवाशांना इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन करण्यात आले होते. यापैकी 25 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला.
त्याचप्रमाणे दोन पुरुष व तीन महिला अशा उर्वरित पाच जणांना आज रविवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला आहे. होनगा (ता. बेळगाव) येथील मराठी शाळेमध्ये काॅरन्टाईन करण्यात आलेल्या सर्व प्रवाशांची नाश्ता व जेवणखाणाची व्यवस्था केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी केली होती.
या प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांचे औषध-पाणी व्यवस्थित व्हावे यासाठी आमदार जारकीहोळी यांनी जातीने लक्ष दिले होते.
यासाठी एक-दोनदा त्यांनी होनगा काॅरन्टाईन केंद्राला भेटही दिली होती. इतक्या आस्थेने आपली काळजी घेतल्याबद्दल संबंधित रुग्णांनी आमदार सतीश जारकीहोळी यांना धन्यवाद दिले आहेत.