युवा समिती करणार राजेश पाटलांचा सत्कार
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती ची बैठक जत्तीमठ बेळगाव येथे आयोजित करण्यात आली होती, अध्यक्षस्थानी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके हे होते.
प्रारंभी मागील बैठकी नंतर आजपर्यंत ज्यांचे ज्यांचे निधन झाले आहे त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्या मध्ये माजी आमदार अर्जुनराव हिशोबकर, माजी आमदार नारायण तरळे, उचगाव बेळगावचे शहीद राहुल सुळगेकर, हैद्राबाद दिशा प्रकरण आणि उन्नाव प्रकरणाचा निषेध आणि अत्याचारित भगिनींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कदम नवीन महाराष्ट्र सरकारचे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अभिनंदन करण्यात आले, आणि त्यांनी तातडीने सीमाप्रश्नी बैठक घेऊन जी कार्यतत्परता दाखवली त्याबद्दल आणि मा. एकनाथ शिंदे आणि मा.छगन भुजबळ यांच्याकडे सीमासमन्वक मंत्री पद सोपवण्यात आले त्याबद्दल सुद्धा अभिनंदन करण्यात आले,
तसेच लवकरच चंदगड चे आमदार श्री राजेश पाटील ज्यांनी सिमावासीयांना स्मरून शपथ घेतली होती त्यांचा जाहीर सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सीमाप्रश्नी सर्वांचे ध्येय एक असतांना सुद्धा बेळगावातून वेगवेगळे प्रवाह वाहतात त्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेऊन जो सल्ला वरिष्ठांना दिला आहे तो सर्वानी मान्य करावा आणि समितीत दिलजमाई व्हावी असा सूर सुद्धा सदर बैठकीत उमटला आणि याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना अजूनही तीव्र आहेत हे प्रकर्षाने जाणवले.तसेच येत्या काळात मुंबई येथे झालेल्या बैठकीचा तपशील सर्व कार्यकर्त्यांना मिळावा यासाठी सर्व नेतेमंडळींना विनंतीपत्र देऊन एक संयुक्त बैठक घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
यावर्षीच्या किल्ला स्पर्धा रद्द करून यावेळी विध्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा छ.शिवाजी महाराज, शिवरायांचे गडकिल्ले आणि सीमाप्रश्न या विषयावर घेण्याचे ठरविण्यात आले लवकरच त्याचा तपशील जाहीर करण्यात येईल.याव्यतिरिक्त अनेक विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीला अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील,किरण धामनेकर, नितिन आनंदाचे, युवराज मलकाचे,महेश जाधव,अभिजीत मजुकर, सुरज कुडूचकर, चद्रकांत पाटिल, सुरज चव्हाण, राजु पाटिल, राकेश सावंत, ज्ञानेश्वर मण्णूरकर ,सुदर्शन पाटिल, मल्हारी पावशे, वासु सामजी
,किशोर मराठे, अश्वजीत चौधरी, बापु भंडागे, विशाल गौडांडकर, सिद्धार्थ चौगुले, चंद्रकांत पाटील,साईनाथ शिरोडकर
,विनायक कावळे, किरण मोदगेकर
महंतेश कोळूचे, अजय सुतार
रोहित गोमानाचे,
मनोहर हुंदरे आदी सदस्य उपस्थित होते सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले.