Thursday, April 18, 2024

/

भाषिक गुलामगिरीविरुद्ध साहित्यिकांनी उठवावा आवाज : शिवूरकर

 belgaum

भाषिक गुलामगिरीने अवकाश व्यापला असताना साहित्यिकांनी त्यावर आवाज उठवणे गरजेचे आहे व साहित्य संमेलनांमधून त्याला बळ मिळावे, असे मत संगमनेर नाशिकच्या ज्येष्ठ साहित्यिका ॲड. निशा शिवूरकर यांनी व्यक्त केले.

बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्यावतीने रविवारी मरगाई देवस्थान परिसरातील पु. ल. देशपांडे साहित्य नगरीमध्ये आयोजित 14 व्या मराठी साहित्य संमेलन संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी सांगलीचे ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन, राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्र शासन मुंबईच्या बृहनमहाराष्ट्र अधिकारी श्वेता परुळेकर, आजरा निपाणीचे शिरगुप्पे, बेळगाव ग्रामीण माजी आमदार संजय पाटील, चंदगडचे आमदार राजेश पाटील, स्वागताध्यक्ष शकुंतला बोकडे, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, अरुण गुरव, दामोदर मोरे, ॲड. सुधीर चव्हाण, विनय कदम, रमेश गोरल, हनुमंत मजूकर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या डॉ. ज्योती जाधव, सांगलीच्या मनीषा पाटील, प्रतिभा जगदाळे, मोहन मोरे आदी उपस्थित होते.

भाषा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे जात असते त्यामुळे विविध भाषेतील पुस्तके जपणे हे आपल्या पिढीचे कर्तव्य आहे हे धर्माचे राजकारण ओळखून त्याबाबत प्रबोधन करणे साहित्यिकांचे कर्तव्य आहे हे त्यांनी जगण्याचे प्रश्न मांडले पाहिजेत असेही ही शिऊरकर यांनी आपल्याला भाषणात सांगितले. अध्यक्षीय भाषणापूर्वी समजत संमेलन संयोजकांतर्फे आयोजकांतर्फे चंदगड चे आमदार राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना आमदार राजेश पाटील यांनी सीमा प्रश्न आपण सीमावासीयांसोबतच राहू अशी ग्वाही दिली.
रविवारी सकाळी गावातील रवळनाथ देवस्थान येथून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. ग्रंथ पुजन आणि पालखी पूजन अनुक्रमे दामोदर मोरे, ॲड. सुधीर चव्हाण, मोहन मोरे व मनोहर मोरे यांच्या हस्ते झाले. धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्याचे पूजन विनय कदम यांच्या हस्ते तसेच हुतात्मा स्मारक पूजन जे. एम. फगरे व एन. के. नलवडे यांच्या हस्ते झाले. गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या ग्रंथदिंडीत साहित्यिक, व्याख्याते लेखक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह साहित्यप्रेमी सहभागी झाले होते. पु. ल. देशपांडे साहित्य नगरी येथे ग्रंथ दिंडीची सांगता झाली.

 belgaum
Belgundi
Belgundi

याप्रसंगी पु. ल. देशपांडे साहित्यनगरीचे उद्घाटन कंत्राटदार विजय धामणेकर यांच्या हस्ते फित कापून झाले. त्यानंतर बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांचे पुतणे राजेश पाटील यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. प्रारंभी अजित सगरे यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्षा शकुंतला बोकडे यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर माजी आमदार संजय पाटील, चंदगडचे आमदार राजेश पाटील, संमेलनाध्यक्षा ॲड. निशा शिऊरकर, ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन, श्वेता परुळेकर, राजा शिरगुप्पे, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, निवृत्त प्राध्यापिका पौर्णिमा पाटिल, बेळगावच्या माजी महापौर रेणू किल्लेकर, सरिता पाटील, ता पं. सदस्या गीता ढेकोळकर आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ दालनाचे, नाट्य महर्षी वरेरकर सभागृह, बी. आर. गामा गुरुजी व्यासपीठाचे उद्घाटन आणि साहित्य सरिता अंकाचे प्रकाशन पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले.

स्नेहभोजनानंतर संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या संशोधिका विभाग प्रमुख(रसायनशास्त्र ) डॉ. ज्योती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यातील स्त्री दर्शन या विषयावरील परिसंवाद पार पडला. या परिसंवादामध्ये सांगलीच्या मनीषा पाटील, कवयित्री प्रतिभा जगदाळे आणि तरुण भारत बेळगावच्या ज्येष्ठ पत्रकार मनीषा सुभेदार यांचा सहभाग होता.
परिसंवादानंतर नियती फाउंडेशन बेळगावच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली सरनोबत यांचे आरोग्य एक जीवन साधना या विषयावर व्याख्यान झाले.

चौथ्या आणि अखेरच्या सत्रात ज्योती म्हापसेकर लिखीत मुलगी झाली हो हे सामाजिक पथनाट्य श्रमिक स्त्री मुक्ती संघटना मुंबई यांच्यातर्फे सादर करण्यात आले.
संमेलन यशस्वी करण्यासाठी श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्य सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना गामा परिवार बेळगुंदी, बिजगरणीचे सचिन जाधव, जि पं सदस्य मोहन मोरे व अशोक गावडा यांचे सहकार्य लाभले.
सदर संमेलनास बेळगुंदीसह बेळगाव खानापूर व निपाणी परिसरातील साहित्यिक, कवी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह बहुसंख्य साहित्यप्रेमी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.