belgaum

हणमंतगौडनगर, येळ्ळूर रहिवाशांची बस थांब्याची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर गावाबाहेरील विस्तारित प्रदेशातील हणमंतगौडनगर या दिवसेंदिवस विस्तारणाऱ्या वसाहतीतील विद्यार्थी व रहिवाशांची गैरसोय लक्षात घेऊन या नगराच्या ठिकाणी बस थांब्याची सोय करावी, अशी मागणी हणमंतगौडनगर येथील रहिवाशांनी वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

हणमंतगौडनगर येथील रहिवाशांनी आज बुधवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागीय आयुक्तांना सादर केले. आपल्या मागणी संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना हणमंतगौडनगर येथील रहिवाशांनी सांगितले की, येळ्ळूर गावाबाहेरील विस्तारित प्रदेशातील हनुमणगौडनगर ही वसाहत निर्माण झाली आहे.

ही एक मोठी वसाहत असून या ठिकाणी महाराष्ट्र हायस्कूल तसेच श्री चांगळेश्वर हायस्कूल या शाळा आणि मंगल कार्यालयं आहेत. ही वाढती वसाहत असून या वसाहतीच्या ठिकाणी परिवहन मंडळाच्या बसेस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह स्थानिक रहिवाशांची येण्या-जाण्याची गैरसोय होत आहे त्यामुळे या नगरासाठी बस थांब्याची अत्यंत गरज आहे.

 belgaum

त्यासाठीच आज आम्ही वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी येथे जमलो आहोत. हणमंतगौडनगर येथे तात्काळ बसथांबा भरून त्या ठिकाणी बसेस थांबण्याची सोय करावी अशी आमची मागणी आहे, जेणेकरून शालेय विद्यार्थी आणि रहिवाशांची गैरसोय होणार नाही.

निवेदन सादर करतेवेळी चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, दिलीप पाटील, नारायण दळवी, एकनाथ पाटील, महादेव कदम, प्रकाश पाटील, सुशांत पाटील, विनायक पाटील, राजू पाटील आदींसह हणमंतगौडनगर रहिवाशी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.