belgaum

बाँडधारक घरांना वीजजोडणीच्या निर्णयाचे अंजुमनकडून स्वागत

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बाँडच्या आधारे बांधलेल्या घरांना तातडीने वीजजोडणी देण्याचे आदेश जारी केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बेळगाव येथील अंजुमन-ए-इस्लाम संस्थेने अभिनंदन केले आहे. यासंदर्भातील अभिनंदनपत्र आज बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

बुधवारी दुपारी अंजुमन संस्थेच्या एका शिष्टमंडळाने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी बॉण्डच्या आधारे बांधलेल्या घरांना तातडीने बीज जोडणी देण्याचे आदेश जारी केले आहे असे सांगत अभिनंदन केले आहे.

यावेळी बोलताना अंजुमन-ए-इस्लामच्या उत्तर कर्नाटक विभागाचे प्रमुख सलीम खतिब यांनी सांगितले की, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात बाँडच्या आधारे घरे बांधलेल्या अनेक नागरिकांना वीजजोडणी मिळाली नव्हती.

 belgaum

मात्र मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने वीजजोडणी देण्याचे आदेश दिले. त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेणारे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि लोकप्रतिनिधी यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.

हमीद कोप्पद यांनी सांगितले की, बाँडच्या आधारे बांधलेल्या घरांना वीजजोडणी, उर्दू भवन, पदवी महाविद्यालय तसेच हज भवन उभारणीसारखी विविध कामे पूर्ण केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांचे आम्ही ऋणी आहोत. याचबरोबर बाँडच्या आधारे बांधलेल्या घरांना मालकी हक्काची कागदपत्रेही देण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रसंगी अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचे पदाधिकारी आणि प्रमुख सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.