belgaum

आरपीडी सर्कल येथे सांडपाण्याची समस्या गंभीर

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आरपीडी सर्कल परिसरात गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या भागातील ड्रेनेज वाहिन्या वारंवार तुंबत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून महापालिकेने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.

आरपीडी सर्कलची ही सांडपाण्याची समस्या आता नित्याचीच बनली आहे. प्रशासनाकडून एकदा दुरुस्ती केली की काही दिवसांसाठी हा त्रास बंद होतो,

 belgaum

मात्र काही दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. या वर्दळीच्या चौकात सांडपाणी साचल्यामुळे पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले असून अपघातांचा धोकाही वाढला आहे.

या समस्येमुळे बेळगावच्या स्मार्ट सिटी मोहिमेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.