डिसेंबर नऊ नंतर राज्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार असून पुन्हा संमिश्र सरकार सत्तेत येण्याचे संकेत माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिले आहेत.
निधर्मी जनता दल राज्यात पुन्हा एकदा किंगमेकरची भूमिका बजावेल असे विधान कुमारस्वामी यांनी नंदी कुरुळी येथे निजद उमेदवार अशोक पुजारी यांच्या प्रचारासाठी आलेले असताना केले.
पत्रकारांनी तुम्ही किंगमेकर होणार काय विचारले असता मी किंगमेकर नाही जनता किंगमेकर आहे असे उत्तर कुमारस्वामी यांनी दिले.आमचे उमेदवार शेतकऱ्यांसाठी लढणारे आहेत.त्यांनी साखर कारखाना काढून ऊसाची बिले थकवली नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.
गेल्या काही दिवसांपूर्वी कुमारस्वामी यांनी पोट निकडणुकीत काहीही निकाल येउदेत भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थिर करू असे वक्तव्य केले होते मात्र गोकाक मधील पोट निवडणुकीत मात्र त्यांनी भाजपच्या कमी जागा येतील आणि पुन्हा राज्यात संमिश्र सरकार सत्तेत येईल असे संकेत दिले आहेत.