Friday, April 26, 2024

/

ट्रबलशुटर आयुबखान…

 belgaum

संकटात सापडलेले पक्षी,प्राणी,माणसे यांची सुटका करून त्यांना जीवनदान देणाऱ्या गोकाकच्या आयुब खान म्हणजे संकटात सापडलेल्या व्यक्ती,प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी देवदूतच आहे म्हणावे लागेल.गोकाकमधील 47 वर्षाचे आयुब खान हे उद्योजक आहेत.पण संकटात सापडलेल्या पक्षी,प्राणी आणि माणसांना मदत करणे आणि त्यांची सुखरूप सुटका करणे हे त्यांच्या जीवनाचे मिशन बनले आहे.

पंधराव्या वर्षी निसर्गाच्या संपर्कात ते आले तेव्हापासून जंगल,पक्षी,प्राणी यांचे त्यांना आकर्षण निर्माण झाले.2000 मध्ये त्यांनी एक्सप्लोर द आऊटडोर ही संस्था स्थापन करून त्यांना कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी परिस्थिती हाताळायचे याचे प्रशिक्षण दिले.

 

 belgaum
Ayub khan
Ayub khan

गोकाक आणि आजूबाजूच्या जंगलात आयुब खान हे नेहमी फिरत असतात त्यामुळे तेथील जंगल त्यांच्या ओळखीचे आहे.आजवर त्यांनी गरुड,साप, अजगर,बैल,मगर,साळिंदर आदींना त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवदान दिले आहे.कोठेही पक्षी अडकला असेल,प्राणी अडकून पडला असेल तर आयुब खान यांना फोन येतो.फोन आला की लगेच आवश्यक साहित्य घेऊन ते पक्षी, प्राण्याची सुटका करण्याच्या मिशनवर निघतात.

Ayub khan
Ayub khan

एकदा तालुका प्रशासनाकडून त्यांना गोकाक धबधब्यात दगडात अडकलेला मृतदेह काढण्यासाठी बोलावणे आले.त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकशे साठ फूट खाली उतरून दगडात अडकलेला मृतदेह काढला.विहिरीत पडलेले दोन बैलही त्यांनी बाहेर काढून त्यांना जीवदान दिले आहे.भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या साळीदरला आणून त्याच्यावर उपचार केले.नंतर त्याला जंगलात नेऊन सोडले.आयुब खान यांच्या संस्थेचे पंचवीस प्रशिक्षित व्यक्ती आहेत.या शिवाय शंभरहून अधिक कार्यकर्ते त्यांना आणीबाणी प्रसंगी मदत करायला सज्ज असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.