बेळगाव लाईव्ह : हायकमांडने मला लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितलेले नाही. मात्र अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी सर्वांना तयारी करावी अश्या सूचना दिल्या गेल्या आहेत असे मत बेळगावचे पालकमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले
ते बेळगाव शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिर आवारात शनिवारी पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून जास्तीत जास्त जागा जिंकून द्याव्यात अशा सूचना नुकत्याच दिल्लीत झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत असे स्पष्ट केले.
बेळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला विजयी करणे हे आपले कर्तव्य आहे. बंगळुरमध्ये उमेदवार निवडीबाबत पहिल्या बैठकीत आधीच चर्चा झाली आहे. दुसऱ्यांदा लवकरात लवकर बेळगावात बैठक घेऊन चर्चा करू असेही ते म्हणाले.
हायकमांडने मला लोकसभा निवडणूक लढवण्याची सूचना केलेली नाही. इच्छुक उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल. विद्यमान आणि माजी मंत्र्यांनी निवडणूक लढवावी, असे कुठेही म्हटलेले नाही. विजयाची शक्यता असलेल्या उमेदवाराला संधी देऊ. विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर काँग्रेस लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. मात्र या निवडणुकीत अधिक जबाबदारी असल्याचे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले.
पोलिसांकडून बेळगावात अपंगांवर झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, या हल्ल्याचा व्हिडिओ मी पाहिला आहे. याबाबत शहर पोलिसांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गृह ज्योती ही शासनाची चांगली योजना आहे. आधीच ठिकाणी. त्याचा लाभ आजपासून राज्यातील जनतेला मिळणार आहे. याचा फायदा अनेक गरीब लोकांना होईल, असे ते म्हणाले.
आमदार बाबासाहेब पाटील, विश्वास वैद्य आदी उपस्थित होते.