जी गोष्ट आपल्या घरच्यानाही सांगू शकत नाही ती गोष्ट सांगण्याचे ठिकाण म्हणजे मैत्री…सदा,सखा अनाधी कालापासून अनंत काळा पर्यंत हृदयस्थ जोडण्याची प्रक्रिया म्हणजे दोस्ती…
कृष्णाचा सखा सुदामा अर्जुनाचा सखा कृष्ण,दुर्योधनाचा सखा कर्ण,महादजी शिंदेचा सखा राणेखान छ्त्रपती संभाजी राजेंचा सोबती कवी पुलेश ही सगळी उदाहरणे मैत्रीच्या धाग्याची विण सांगणारी आहेत.काही भली असतील काही बुरी असतील पण उदाहरणे मात्र सच्या दोस्तीची आहेत या दोस्तीतून निघणाना परिणाम चांगला वाईट असेलही सच्चा दोस्तीची नाती अधोरेखित करणारी आहेत.
लाखों माणसातून एखाद्याशी आपले सुर जुळावेत याला विधीलखित कारण असावे. अर्जुनाला युद्धात जय मिळवून देणारा सखा कृष्णा जसा होता तसा दुर्योधनाला युद्धात पराभवासाठीही साथ देणारा कर्ण देखील होता.कलुशा म्हणून इतिहासात बदनाम होताना मराठेशाही साठी शंभू राजा बरोबर मरण पत्करणारे कवी कुलेश महत्वपूर्ण होते हा मैत्रीचा आकृतीबंध स्थळ काळ व्यक्ती नुसार जरी बदलत असला तरी मूळ मात्र स्नेह बंधनच आहे.
सोमवारी अनेक शाळा कॉलेज मधून फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे त्यासाठी अनेकांनी फ्रेंडशिप बँड खरेदी केले आहेत. ऑगष्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस साजरा करण्याचे फॅड वाढले आहे यासाठी रविवारी अनेकांनी सोशल मीडियावर एकमेकांस मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या.बेळगाव शहरातील बहुतांश स्टेशनरी दुकानात फ्रेंडशिप बेल्ट खरेदी करण्यासाठी गर्दी होती.
अश्याच एका मैत्रिणींच्या ग्रुपने बेळगावात रविवारी युनिक पद्धतीने मैत्री दिन साजरा केला.रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट समजल्या जाणाऱ्या मैत्रीच्या नात्याचं सेलिब्रेशन करण्याचा दिवस म्हणजे ”फ्रेंडशिप डे”. ऑगष्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी उत्साहाने हा दिवस र साजरा केला जातो. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ”फ्रेंडशिप बँड” बांधण्याची चढाओढच मित्रांममध्ये यांनिमित्ताने दिसून येते.
शहरातील महिला विद्यालयाच्या 2002 च्या मैत्रिणींनी रविवारी वर्षातील एक दिवस मैत्रिणीच्या सहवासात जात साजरा केला. दरवर्षी या मैत्रिणी एकत्र येऊन जुन्या शाळेतील आठवणींना उजाळा देतात. एकूणच सर्वत्र मैत्री दिना निमित शुभेच्छा संदेशांची देवाण घेवाण सुरू आहे.अश्या या मैत्री दिनाच्या सर्वांना शभेच्छा..
HAPPY FRIENDSHIP DAY