आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचार संहिता लागू होण्याच्या पंधरा दिवसांचा काळ म्हणजे निवडणूक लढवणाऱ्यांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. या पंचर दिवसाच्या काळात यात्रा सण मिरवणूका सह कोणताही सार्वजनिक कार्यक्रम मिळाल्यास प्रत्येक जण सहभागी होऊन आपण निवडणूक लढवणायसाठी सिद्ध आहोत हे दाखवत असतो.
एकीकडे विध्यमांन आमदार विकास कामाचे उदघाटन करायचास झपाटा लावत असताना दुसरीकडे इच्छुक मात्र सण यात्रा जत्रेना हजेरी लावणे पसंद करत आहेत. बेळगाव तालुक्याची आराध्य दैवत मानली जाणारी उचगाव येथील श्री मळेकरनी देवीच्या सप्ताहाच्या निमित्ताने देखील याचीच प्रचिती आली
श्री मळेकरणी देवीचीच्या सप्ताहाची रविवारी महाप्रसादाने सांगता होत आहे. सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.पाच दिवस हा सप्ताह सुरु आहे वर्षातून एकदाच देवीचा सप्ताह होत असतो . गेल्या पाच दिवसांमध्ये रोज सकाळी सायंकाळी देवीची महाआरती करण्यात आली. गेल्या पाच दिवसात पार पडलेल्या महारथीला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. त्याचबरोबर दिवसभर देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. रोज रात्री भारुड, भजन, महिला भजन व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
त्याचबरोबर महिला दिनाच्या ओच्चित्य साधून महिलांचा सन्मानही करण्यात आला. तसेच या भागातील महिला युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून उत्सव समितीने रांगोळी स्पर्धेचे आयोजनही केले होते. सप्ताह उत्सवात सर्व स्तराचे नागरिकांनी भेटी देऊन देवीचे दर्शन घेतले. तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर आज रविवारी महाप्रसादाने देवीच्या सप्ताहाची सांगता होत आहे.
दरम्यान नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या मळेकरणीदेवीच्या दर्शनासाठी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची आवर्जून उपस्थिती दिसली. त्यांनी देवीचे दर्शनही घेतले. आपणाला विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळावे, निवडणुकीत विजय मिळावा. यासाठी देवीला साकडेही घातले.