28 C
Belgaum
Monday, September 25, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 6, 2023

शहराच्या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत आक्रमक पवित्रा

बेळगाव लाईव्ह : मनपा सभागृहात महापालिकेच्या अर्थसंकल्प पूर्व बैठकीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्व नगरसेवक आणि आमदारांनी शहरात कोलमडलेल्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याबाबत तीव्र संताप व्यक्त करत शहरातील पाणीपुरवठा समस्या निर्माण होण्यासाठी कॅन्टोन्मेंट...

तालुका पंचायतींचे नवे मतदारसंघ जाहीर

बेळगाव लाईव्ह : पंचायतराज आणि ग्रामविकास खात्याने तालुका पंचायतींचेही नवे मतदारसंघ जाहीर केले असून लवकरच आरक्षणही जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांबाबत उच्च न्यायालयाने दंडात्मक कारवाई करत कानउघाडणी केल्यामुळे सरकारने अखेर तालुका पंचायत निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील तालुका पंचायत...

शहरात 17 हजार मोकाट कुत्री, 2100 श्वानांची नसबंदी*

बेळगाव - बेळगाव महापालिका निवडणूक होऊन, सव्वा वर्ष उलटल्यानंतर महापौर उपमहापौर पदाची निवडणूक झाली. त्यानंतर अद्यापही स्थायी समिती रचना झालेली नाही. अशा दोलायमान स्थितीत आज बेळगाव महापालिकेत अर्थसंकल्पावर चर्चेसाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अर्थसंकल्पातील तरतुदी आणि सूचना...

परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचे २४ पासून पुन्हा आंदोलन

बेळगाव लाईव्ह :परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता झाली नसल्याने२४ मार्चपासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी १ मार्च रोजी संप पुकारला होता. या संपात परिवहन महामंडळाचे कर्मचारी सहभागी झाले नव्हते. त्यामुळे २४ मार्चपासून परिवहन...

पत्रकार आक्रमक होताच नरमले मनपा आयुक्त

महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीचे वृत्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारांना मज्जाव करणारे महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेताच नरमल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत नेहमीच आडमुठी भूमिका...

… हा तर शिवछत्रपतींसह शिवभक्तांचा अवमान -कोंडुसकर

शिव सन्मान पद यात्रेद्वारे छ्त्रपती शिवाजी महाराजांचा सीमा भागात होणाऱ्या अवमानाची जनजागृती करणारे  समिती नेते रमाकांत कोंडूस्कर यांच्या राजहंस गड या विषयावर संपर्क साधून बेळगांव live ने संवाद साधला. येळ्ळूर राजहंस गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दोन दोनदा उद्घाटन होणे...

मूर्ती अनावरणावर शिवसेना नेते संजय पवार यांनी व्यक्त केली ‘अशी’ प्रतिक्रिया

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेला सध्याचा विषय म्हणजेच राजहंसगड. राजहंसगडावर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून राजकारण्यांनी जोरदार राजकारण सुरु केले असून यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याव्यतिरिक्त मराठी मतांसाठी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरु असलेले...

होळी, रंगपंचमीबाबत सामाजिक कार्यकर्त्यांचे आवाहन

होळी उंच उभारून स्पर्धा -इर्षा न करता पर्यावरण संरक्षणासाठी लहान प्रतीकात्मक होळी उभारावी. रंगपंचमीला नैसर्गिक आणि कोरड्या रंगांचाच वापर करावा. रासायनिक रंग वापरू नयेत आणि भटकी कुत्री आणि जनावरांच्या अंगावर रंग उडवू नयेत, असे कळकळीचे आवाहन आज होळी आणि...

राजहंस गड प्रकरणी समिती आक्रमक, करणार शिवरायांच्या मूर्तीचे शुध्दीकरण

राष्ट्रीय पक्षा कडून राजहंस गड येथे दोनदा छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले या घटनेच्या पार्श्वभमीवर बेळगाव तालुका आणि शहर समितीची संयुक्त अशी महत्वपूर्ण बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली आहे. मराठा मंदिरात बुधवारी दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीत राजहंस...

महाराष्ट्रातील राजकारण्यांमुळे सीमावासीयांची अवस्था ”मुहाजिर”सारखी!

बेळगाव लाईव्ह विशेष : गेली ६६ वर्षे अनेक अत्याचार सहन करून, हुतात्म्यांचे रक्त सांडून तळमळीने धगधगत सुरु ठेवलेल्या सीमाप्रश्नी सीमावासीयांची ससेहोलपट सुरु आहे. अशावेळी महाराष्ट्राकडून खंबीर पाठिंब्याची गरज असताना महाराष्ट्रातील नेतेमंडळीच कर्नाटकाची पाठ थोपटण्यात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळत...
- Advertisement -

Latest News

हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !