belgaum

बेळगाव – बेळगाव महापालिका निवडणूक होऊन, सव्वा वर्ष उलटल्यानंतर महापौर उपमहापौर पदाची निवडणूक झाली. त्यानंतर अद्यापही स्थायी समिती रचना झालेली नाही. अशा दोलायमान स्थितीत आज बेळगाव महापालिकेत अर्थसंकल्पावर चर्चेसाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अर्थसंकल्पातील तरतुदी आणि सूचना ऐवजी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करायचा यावरच सर्वाधिक चर्चा झालेली पाहायला मिळाली.

bg

महापौर उपमहापौर निवडणूक होऊन महिना झाल्यानंतर आज सोमवारी महापौरांनी थेट अर्थसंकल्प बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वप्रथम काही नवनिर्वाचित सदस्यांनी पदाची शपथ घेतली. निर्वाचित सदस्यांना आजच्या सभागृहातील बैठकीचा पहिलाच अनुभव होता.

त्यामुळे अर्थसंकल्पावर काय मत मांडावे याबाबत बहुसंख्य सदस्यांनी गप्प राहणेच योग्य समजले. त्यातच काही सदस्यांनी प्रभागातील समस्या मांडल्या तर बऱ्याच सदस्यांनी शहरातील मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत चिंता व्यक्त केली. बैठकीला उपस्थित शहराच्या दोन्ही आमदारांनीही मोकट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत मांडले.

यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी म्हणाले, मोकाट कुत्र्या संदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. महापालिकेच्या वतीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात आहे. बेळगाव शहरात 17 हजार कुत्री आहेत. यामध्ये 2100 श्वानांची नसबंदी करण्यात आली आहे.

महापालिकेकडे केवळ 30 कुत्र्यांना ठेवून घेण्याची व्यवस्था आहे.कुत्री पकडण्यासाठी आसाम येथून पाच जण आले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करताना प्राणी दया संघाच्या सुचनांबाबतही खबरदारी घ्यावी लागत आहे असे स्पष्ट केले.

Street Dogs
Street Dogs file photo

दरम्यान आजच्या अंदाजपत्रक चर्चेच्या बैठकीत शहरातील सांडपाण्याची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, विविध ठिकाणी कुपनलिका खोदण्यात याव्या, सांडपाणी ओढण्याचे सक्कर वाहन खरेदी, नवी शववाहिका खरेदी, वृक्ष लागवड, पाणी आडवा पाणी जिरवा व्यवस्था, एसटीपी प्लांट,महापालिकेचे बडे थकबाकीदार यांबाबत साधक बाधक चर्चा चर्चा करण्यात आली.
नगरसेवक शंकर पाटील, ए.आर.रहमान किल्लेदार., शहीद खान पठाण, मुजम्मिल कोणी, राजशेखर डोनी रवी साळुंखे, गिरीश घोंगडी, नितीन जाधव व अन्य सदस्यांनी आपली मते मांडली. आमदारांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढविण्यात येऊ नये अशी सूचना केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.