Daily Archives: Mar 27, 2023
विशेष
चिरमुरी – तुरमुरी
शिष्य : गुरुजी, सगळेच कसे एकाच झेंड्याखाली एकवटलेत? अशी अभूतपूर्व एकी झालेलं आगळं-वेगळं चित्र वेणुग्राम मध्ये दिसतंय!, तुमचं काय मत?
गुरुजी : अरे बाबा, ''असतील शीतं, तिथं नाचतील भुतं''! सध्या निवडणुकीचं वारं वाहत आहे. अनेकांना अनेक स्वप्नं पडत आहेत. कुणाला...
बातम्या
गोवा ‘पोलीस डे’ सोहळ्यात माजी महापौर सहभागी
गोवा सरकार आणि राजश्री क्रिएशन राज बिल्डरच्यावतीने गेल्या शनिवारी 'पोलीस डे' साजरा करण्यात आला. या सोहळ्याला बेळगावचे उद्योगपती विजय पाटील, म्हैसूर प्रसादचे अनुप जवळकर व माजी महापौर विजय मोरे यांना खास निमंत्रित करण्यात आले होते हे विशेष होय.
सदर पोलीस...
विशेष
समितीच्या रथाला बुलंद ‘सारथी’ची गरज!
बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि मराठी भाषिकांचे अस्तित्व जपणारी, अस्तित्व सांगणारी आणि अस्तित्व जोपासणारी संघटना म्हणजेच महाराष्ट्र एकीकरण समिती. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हितासाठी, हक्कासाठी, अन्यायाला वाचा फोडून अन्याय दूर करण्यासाठी झगडणारी संघटना म्हणजेच महाराष्ट्र एकीकरण...
बातम्या
‘या’ तीन महापुरुषांच्या पुतळ्यांचा उद्या अनावरण सोहळा
बेळगाव लाईव्ह : सीमाभागात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक समाजातील नागरिकांवर आपली छाप पाडून निवडणुका 'कॅच'करण्याचा प्रयत्न राजकारण्यांनी सुरु केला आहे. गेल्या २-२.५ महिन्यात बेळगावमध्ये शूर-वीरांच्या प्रतिमा-पुतळ्यावरून सुरु असलेल्या राजकारणामुळे नेत्यांपेक्षा पुतळ्यांचेच राजकारण सुरु असल्याचे दिसून येत आहे.
धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्ती...
बातम्या
पॅन-आधार लिंकसाठी नागरिकांची धावपळ
बेळगाव लाईव्ह : प्राप्तिकर विभागाकडून आधार कार्डला पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून येत्या ३१ मार्च पर्यंत आधाराला पॅन लिंक न झाल्यास १ एप्रिलपासून पॅनकार्ड निष्क्रिय करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे आधार-पॅन लिंक करण्यासाठी नागरिकांची...
राजकारण
दक्षिणच्या उमेदवारीसाठी किरण जाधव यांची येडीयुरप्पा भेट
बेळगावचे धडाडीचे मराठी नेते आणि कर्नाटक राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस किरण जाधव यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी शुभाशीर्वादाच्या स्वरूपात पाठिंबा देऊन सुयश चिंतले आहे.
राज्यातील मराठी समुदायाच्या उत्कर्षासाठी झटणारे बेळगाव...
शैक्षणिक
३ ते ८ वयोगटातील मुलांसाठी राज्य अभ्यासक्रमाचा आराखडा
बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क - २०२२ वर आधारित ३ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांच्या मूलभूत स्तरावरील शिक्षणासाठी राज्य अभ्यासक्रमाचा आराखडा शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, तसेच महिला आणि बाल विकास विभागाने...
बातम्या
शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग; लाखोचे नुकसान
शॉर्ट सर्किटमुळे मेणसी गल्ली येथील उत्तम नोव्हेल्टी या दुकानाला आग लागून स्टेशनरीसह सजावटीचे साहित्य वगैरे जळून भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली.
आगीमुळे नुकसान झालेले उत्तम नोव्हेल्टी हे दुकान महिपाल सिंग यांच्या मालकीचे आहे. शहरातील...
बातम्या
येडीयुरप्पा मार्गावर 1.23 लाखाची दारू जप्त
एपीएमसी आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत कार गाडीसह 1 लाख 23 हजार 933 रुपये किमतीची दारू जप्त करण्याबरोबरच एकाला अटक करण्यात आल्याची घटना काल रविवारी बी. एस. येडीयुरप्पा मार्गावर घडली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव अनिलकुमार लवप्प...
बातम्या
देव दादा सासनकाठी आज रात्री होणार डोंगराकडे रवाना
बेळगाव शहरातील मानाची देव दादा सासनकाठी आज सोमवारी रात्री 9 वाजता चव्हाट गल्ली येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थान देवघर येथून बैलगाडी आणि भाविकांचा मोठा सहभाग असणाऱ्या पायी दिंडीने श्री ज्योतिबा डोंगराकडे रवाना होणार असल्याची माहिती चव्हाट गल्ली येथील प्राचार्य आनंद...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...