Tuesday, June 25, 2024

/

चिरमुरी – तुरमुरी

 belgaum

शिष्य : गुरुजी, सगळेच कसे एकाच झेंड्याखाली एकवटलेत? अशी अभूतपूर्व एकी झालेलं आगळं-वेगळं चित्र वेणुग्राम मध्ये दिसतंय!, तुमचं काय मत?

गुरुजी : अरे बाबा, ”असतील शीतं, तिथं नाचतील भुतं”! सध्या निवडणुकीचं वारं वाहत आहे. अनेकांना अनेक स्वप्नं पडत आहेत. कुणाला पैसा मिळवण्याची, कुणाला सत्ता मिळवण्याची! अनेकांना अनेक लाभ दिसत आहेत! म्हणूनच लोक एकत्र राहात आहेत!

शिष्य : गुरुजी, हे चित्र कायम असंच राहील का? एकी राहील का?
गुरुजी : शिष्य, तुला चांगलंच ज्ञात आहे, पृथ्वी गोल आहे! अनेकजण तर वेगवेगळ्या ध्येयाने प्रेरित आहेत! ते अंतर्गत एकमेकांशी वादविवाद करत आहेत! मात्र, जगासमोर एकमेकांच्या स्नेहबंधनात बांधल्याचा देखावा करत आहेत!

 belgaum

शिष्य : नाही गुरुजी! मला असं वाटत नाही. आता सगळ्यांची मने जुळली आहेत असं वाटतंय!
गुरुजी : कोण, कुणाशी, किती मिळून जुळून आहे, यामागचे गौडबंगाल कळेल लवकर तुला! तिकडं काहीतरी ‘तरुण’ मनं आतून एकमेकांशी कुरघोडी करण्यासाठी गुंतलेली आहेत!!! त्यांचा एक वेगळा गट स्वतंत्र पणे आपले काम करत आहे. ‘प्रकाशाची’ वाट वेगळीच आहे!!! जग जरी ‘मनोहर’ दिसत असले, तरी तसं चित्र नसतं वत्सा!

शिष्य : महाराज या गोष्टी माझ्या आकलनाच्या बाहेर जात आहेत!
गुरुजी : अरे, अज्ञानातच सुख आहे! उद्या निवडणूक लागेल, वेगवेगळे उमेदवार उभे राहतील! आणि मग तू बघशील कि, किती मन जुळलेली आहेत!
शिष्य : गुरुजी, तुमचं एकंदर आकलन मला चुकीचं वाटत आहे.

Chirmuri turmuri
गुरुजी : वत्सा, गुरु कधीच चूक नसतो! तो खूप अनुभवाने पिकलेला असतो! त्याला खूप गोष्टी माहीत असतात, त्याने अनेक गोष्टींचा अभ्यास करून हे तुला सांगितलेलं आहे. ६६ वर्षांपासूनचा इतिहास आहे. या संघटनेत अनेक लोक आले, अनेक लोक गेले, अनेकांनी बाहेरून येऊन सत्ता भोगली! अनेक आतून राहून सत्ताधाऱ्यांकडे पहात राहिले. अशा प्रकारच्या अनेक घटना घडत राहिल्या….

शिष्य : मला परत एकदा वाटत आहे कि, या संघटनेतून एकमेव उमेदवार मिळावा आणि त्या संघटनेचा विजय व्हावा!

गुरुजी : स्वप्नं तर चांगले आहे. तुझ्या स्वप्नाला यश मिळूदे, तथास्तु !

क्रमशः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.