24.9 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 25, 2023

आंतरराज्य सीमेवर 24 तपासणी नाके -नितेश पाटील

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून आंतरराज्य सीमेवर एकूण 24 चेकपोस्ट अर्थात तपासणी नाके स्थापना झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील यांनी दिली आहे. निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराज्य सीमेवर स्थापण्यात...

चिरमुरी – तुरमुरी….

शिष्य : गुरुजी, खरा नेता कोण? गुरुजी : जो आपल्या समाजासाठी, सभोवतालच्या भल्यासाठी प्रयत्न करतो, तो चांगला नेता! शिष्य : गुरुजी, चांगला कार्यकर्ता कोण? गुरुजी : ज्याला स्वतःला जनसामान्यांचा पाठिंबा लाभेल, असा विश्वास नसतो , तरीही तो सामाजिक कार्यात अग्रेसर राहू इच्छितो,...

नेमिची येतो मग पावसाळा! प्रशासनाचे उशिरा शहाणपण नको!

बेळगाव लाईव्ह : मागील ३-४ वर्षात अनेक संकटांनी हाहाकार माजवला. अतिवृष्टी, अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परिस्थिती, पुरात अनेकांचे झालेले हाल, नुकसान आणि यानंतर दोन वर्षे कोरोनाचा कहर! या सर्व आपत्कालीन परिस्थितीत बेळगावमधील उणिवा समोर आल्या. दरवर्षी अतिवृष्टीमुळे येणाऱ्या बळ्ळारी नाल्याच्या...

पंचमसाली आरक्षण : २ डी श्रेणीतून ७ टक्के स्वतंत्र आरक्षण

बेळगाव लाईव्ह : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत लिंगायतांसाठी २ डी श्रेणीतून ७ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याचप्रमाणे वक्कलिगांना ६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मागास प्रवर्गातून मुस्लिम आरक्षण...

निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून या निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोग पुढील आठवड्यात अधिसूचना जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्याच्या सहमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत संकेत दिले असून निवडणुकीच्या घोषणेबाबत केंद्रीय...

जिल्ह्यात पुरुषांपेक्षा वाढली महिला मतदारांची संख्या

सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असलेल्या महिलांनी बेळगाव जिल्ह्यातील मतदार संख्येमध्ये आता पुरुषांना मागे टाकले आहे. गेल्या चार वर्षात जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या वाढली असून ती सध्या 69 हजार 317 इतकी नोंद झाली आहे. याउलट पुरुष मतदारांची...

वृक्ष कत्तलीच्या निषेधार्थ उद्या ‘चिपको चळवळ’!

वैयक्तिक स्वार्थापोटी मंडोळी रोड येथील एक विशाल वृक्ष गेल्या गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आला. या कृतीच्या निषेधार्थ तसेच तोडलेल्या झाडांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बेळगाव सोशल नेटवर्कतर्फे उद्या रविवार दि. 26 मार्च रोजी सकाळी 'चिपको चळवळ' हाती घेण्यात...

जिल्ह्यातील काँग्रेसचे 18 पैकी 9 उमेदवार घोषित

आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केले आहे. या यादीमध्ये बेळगाव जिल्ह्यातील एकूण 18 पैकी 9 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून उर्वरित नऊ मतदारसंघाच्या उमेदवारांचा समावेश दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीत...
- Advertisement -

Latest News

शासकीय कार्यालयांच्या बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी पाहणी

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !