पर प्रांतीयांचा लोंढा कर्नाटकात वाढत आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याची धास्ती घेत कर्नाटक राज्य सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना 21 दिवस क्वॉरंटाइन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात चार हजारांचा आकडा पार झाला आहे. बुधवारी दिवसभरात 267 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारला धास्ती लागून राहिली आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस सरकारी आस्थापनांमध्ये क्वॉरंटाइन म्हणून ठेवण्यात येणार आहे तर चौदा दिवस होम क्वॉरंटाइन म्हणून ठेवण्यात येणार आहे. एकूण एकवीस दिवस क्वॉरंटाइन म्हणून प्रवाशांना यापुढे ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
याबाबत लवकरच असे निर्देश आरोग्य खात्याला देण्यात आले. बेळगावातही कोरोना बाधितांची रुग्ण संख्या वाढत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. विशेष करून तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोना लागण झालेल्यांची संख्या वाढली आहे. याची दखल घेत राज्य सरकारने 21 दिवसाचे क्वॉरंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 दिवस इन्स्टिट्यूटशनल तर14 दिवस होम क्वारंटाइन असे मिळून 21 दिवस क्वारंटाइन असणार आहे.
परराज्यातून येणारे प्रवासी अधिकतर कोरोना बाधित म्हणून आढळत आहेत. ही संख्या वाढू नये या दृष्टीकोनातून राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मात्र यासाठी 21 दिवसांचे क्वॉरांटाइन हा एक पर्याय म्हणून आजमावण्यात येणार आहे.