भाजी मार्केट मध्ये जाण्यासाठी नवीन गेटमधून वाहतूक सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यासाठी एपीएमसीने चालवल्या आहेत. ज्योतिनगर कडचे नवीन गेट सुरू करण्यात आले आहे मात्र या गेट मधून वाहतूक सुरू नाही.
जर नवीन ज्योती नगर गेट मधून वाहतूक सुरू झाली तर या रोड मधून वर्दळ वाढणार आहे परिणामी एपीएमसी कंग्राळी खुर्द रस्त्याची वाट लागणार आहे त्यामुळे आधी रस्ता दुरुस्त करा मगच गेट ओपन करा अशी मागणी कंग्राळी खुर्द मधील ग्रामस्था कडून केली जात आहे.
लॉकडाऊन काळात एपीएमसी मधील भाजी मार्केट उपनगरांमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. आता ते मार्केट पुन्हा भाजी मार्केट मध्ये सुरू करण्यात आली आहे. मात्र भाजी मार्केटमध्ये जाण्यासाठी एपीएमसी येथूनच जावे लागत होते. त्यासाठी आता नवीन गेट उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणाहून रस्ताही करण्यात आला आहे. त्या गेटमधून प्रवास करण्यासाठी आता सुरुवात होणार आहे.
मागील पाच ते सहा महिन्यांपासून गेट उभारण्यात आले होते. मात्र रस्त्याचे काम झाले नसल्याने येथून प्रवास करणे शक्य नव्हते. त्यामुळे एपीएमसी मधूनच भाजी मार्केटमध्ये जाण्यासाठी प्रवास सुरू होता. आता हे गेट सुरू झाल्याने बाहेरच्या बाहेर प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे. याची दखल व्यापारी शेतकरी आणि किरकोळ व्यापारयांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.