शेतात धान्य पिकवण्यासाठी बळीराजा शेतात काबाडकष्ट करून घाम गाळतो. पेरणीसाठी दोन शेतकरी आणि बैलजोडी सत्तावीस किलोमीटर चालल्याचे अँपवरून समजले आहे.
किर्तीकुमार कुलकर्णी यांनी वडगाव येथील आपल्या शेतात किसन होसुरकर आणि सुरेश खन्नूकर यांच्या मदतीने बैलजोडीसह साडेचार एकर शेतात भातपेरणी केली.यावेळी उत्सुकता म्हणून किर्तीकुमार कुलकर्णी यांनी शेतकरी आणि बैल यांचे चालणे किती होते याची अँपद्वारे मोजणी केली.त्यावेळी साडेचार एकर शेत जमिनीत पेरणी करण्यासाठी दहा तासात शेतकरी आणि बैल यांनी सत्तावीस किलोमिटर अंतर चालल्याचे समजले.सकाळी आठ ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते संध्याकाळी सात या दहा तासांच्या कालावधीत सत्तावीस किलोमीटर अंतर शेतकरी आणि बैल यांनी चालल्याचे समजले.
शेतातील पेरणी आणि नांगरणीसाठी आपल्याला साधारण किती पायपीट करावी लागते हे जाणून घेण्यासाठी वडगावच्या एका युवा शेतकऱ्याने मोबाईल ॲपचा वापर केला, आणि 10 तासात आपण तब्बल 27 कि. मी. अंतराची पायपीट केल्याचे त्याच्या लक्षात आले.
नांगरणी आणि पेरणी साठी आपण आणि आपल्या बैलांना शेतात दिवसाकाठी साधारण किती किलोमीटर पायपीट करावी लागते? ते जाणून घेण्याची उत्सुकता वडगांव येथील शेतकरी कीर्तिकुमार कुलकर्णी यांना लागून राहिली होती. यासाठी त्यांनी मोबाईल ॲप ट्रॅकरचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मोबाईल ॲपद्वारे त्यांनी तपासणी केली असता त्यांच्या लक्षात आले की आपल्या 4.5 एकर शेत जमिनीमध्ये पेरणी करण्यासाठी आपण स्वतः आणि बैलांनी 10 तासात 27 कि. मी. अंतराची पायपीट केली आहे. यावरून अंदाज येतो की आपल्याला जे अन्नधान्य मिळते त्यासाठी शेतकऱ्यांना किती मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी या बळीराजाला जितके धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहेत.