Thursday, January 2, 2025

/

जिल्ह्यातील 66 टक्के पेरणी पूर्ण

 belgaum

या वर्षी मान्सून पूर्व व मान्सूनने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली आहे. त्यामुळे पेरणीची कामे वेळेत पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 66 टक्के पेरणी पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही 34 टक्के पेरणी पूर्ण व्हायचे आहे.

कृषी विभागाने दिलेले उद्दिष्ट अजून पूर्ण झाले नाही. मात्र लवकरच हे उद्दिष्ट पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे. खरीप हंगामासाठी या वर्षी कृषी विभागाने 6 लाख 88 हजार हॅकटरचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामधील 4 लाख 36 हजार हेक्टरची पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

मागील वर्षी पेक्षा या वर्षी खरीप पेरणीच्या उद्दिष्टमध्ये वाढ करण्यात आली आहे. देण्यात आलेले उद्दिष्ट अजूनही येत्या आठ दिवसात पूर्ण होईल अशी आशा कृषी विभागाला आहे. महत्त्वाचे म्हणजे खानापुर आणि हुक्केरी तालुक्यातील सर्वाधिक पेरणी झाली आहे. त्या अनुषंगाने आता बेळगाव तालुक्यातही 31949 हेक्टर मध्ये पेरणी पूर्ण झाली आहे.Perni Dhulvad perni

सध्या पेरणी झालेल्या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पावसाने मागील आठ दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मागील वेळी आलेल्या पावसामुळे नदी-नाले प्रवाहित झाले होते. आता ते पुन्हा सुकू लागले आहेत. सध्या जर पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट ही शेतकऱ्यावर येणार आहे. त्यामुळे पाऊस कधी पडतो याकडेच साऱ्यांचे आशा लागून राहिले आहेत. शेतकऱ्यांना बियाणे तसेच खते उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मात्र काही ठिकाणी खत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याचबरोबर सोयाबीन पिकांची उगवण चांगली झाली नाही. त्याबद्दल शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत.

सध्या पेरणी झालेली पिके काहीप्रमाणात उगवली आहेत तर कोळपणी व इतर कामेही सुरू आहेत. कृषी विभागाने दिलेल्या उद्दिष्ट नुसार पेरणीची कामे होऊ लागले आहेत. मात्र अजूनही 34 टक्के पेरणीचे उद्दिष्ट शिल्लक असल्याने येत्या काही दिवसात ती पूर्ण होईल अशी आशा कृषी विभागाने व्यक्त केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.