खाजगी इस्पितळानी कोरोना रुग्णांवर उपचार न केल्यास अश्या इस्पितळावर कारवाई करण्याचे इशारा कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांनी बजावला आहे.अश्या प्रकारचा आदेश काढला आहे त्यामुळे भविष्यात खाजगी इस्पितळाना कोरोना संशयित रुग्णांवर देखील उपचार करावे लागणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असून तो रोखण्यासाठी केंद्र,राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य कार्यक्रमात सगळ्या खासगी दवाखाने देखील सहभागी होणे आवश्यक आहे.पण असे असताना काही खासगी दवाखान्यात कोव्हिड 19 सारखी लक्षणे असणाऱ्या रुग्णावर उपचार केले जात नाहीत असे निदर्शनास आले आहे.खासगी दवाखान्यात उपचार घेण्यास येणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे आवश्यक आहे.
खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या रुग्णावर उपचार केले नाही तर त्यांच्यावर आपत्कालीन कायदा अन्वये कारवाई केली जाईल असा आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी बजावला आहे.