वाढत्या शहरीकरणात 40 टक्के लोकांनी शहरीकरणाचा भाग व्हावे आणि 2030 पर्यंत जीडीपी मधील त्यांचा वाटा पंच्याहत्तर टक्के असावा असे उद्दिष्ट आणि सोयीसुविधा उपलब्ध करून नागरिकांना एक स्मार्ट बनविण्याचे काम आणि शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टिकोनातून राबवलेले विकास कामे करण्याचा पाया बनत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी ची संकल्पना ही विद्रुपीकरण यांच्या वाटेने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
कोणत्याही देशासाठी शहरेही विकासाची यंत्रे असतात. आपल्या भारताचे नेमके असेच आहे. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी तीस टक्के नागरिक शहरात राहतात तर उर्वरित नागरिक ग्रामीण भागात असतात. त्यामुळे देशाचा विकास हा शहरी विकासाबरोबरच होत असतो शहराचा विकास कसा होईल तसा नागरिकांना शहरीकरणाकडचा ओढा वाढेल या दृष्टिकोनातून स्मार्ट सिटीची संकल्पना राबविण्यात येते. बेळगावची असे झाले आहे. बेळगावची जनता शहराकडे वाढावी या दृष्टिकोनातून बेळगावचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आला होता. मात्र केवळ आणि केवळ भकासिकरण विकासाच्या दृष्टिकोनातून स्मार्ट सिटी ची कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांची जीवनशैली दर्जात्मक व्हायला हवी लोक शहरांमध्ये गुंतवणुकीस आकर्षण व्हायला हवेत विकास आणि बुद्धीच्या या वाटचालीत हे एक असेच प
पाऊल निर्माण करण्यासाठी प्रयत्न केंद्र सरकारने केले. मात्र अनेक शहरात यांची पाळेमुळे खोल रुजली नसल्याने विकास करण्याचे विद्रुपीकरण सध्या सुरू आहे.
स्मार्टचा अर्थ विकसित आणि सुंदर असा घेतला आणि संयुक्तरित्या मराठीमध्ये एक सुंदर विकसित शहर असा अर्थ होतो. सोप्या शब्दात या संकल्पनेची व्याख्या करता येते स्मार्ट सिटी ही एक संकल्पना आहे. ती प्रत्येक देशात आणि प्रत्येक शहरात वेगवेगळी ठरू शकते. या दृष्टिकोनातून बेळगाव शहराला एक उज्ज्वल आणि प्रज्वल असे भवितव्य आणून देणारी ही संकल्पना सध्या काळाच्या ओघात वाहून जात आहे. विकास कामाची गंगा आनणाऱ्या लोकप्रतिनिधींनी टक्केवारीच्या नादात या विकासाला खीळ घातली आहे. त्यामुळेच या स्मार्ट शेतीची संकल्पनाचा बोजवारा उडाल्याचे सध्या दिसून येत आहे.