शहराची सुधारणा शहरांना पुनरुज्जीवन आणि विस्तार यातील तत्त्वावर या स्मार्ट चुकीचे धोरण आखले होते. यामध्ये हरितपट्टा विकसित करण्याबरोबरच त्यांना सिटी विकासाला विशेष महत्त्व दिले जाणार होते. यासाठी पुनर्विकासाचे धोरण राबविले जाणार होते. मात्र बेळगावात उलट सुरू आहे. त्यामुळे विकासाच्या गतीला ब्रेक आणि भकासाच्या गतीला वेग अशी अवस्था बेळगावची झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीची व्याख्या धूसर होत असल्याचे बोलले जात आहे.
पुनर्विकासाच्या धोरणात उपलब्ध बिल्डर आणि नवीन सुधारणेस वाव असणार्या पुढचा विचार केला जाणार होता. पन्नासहून अधिक परिसरात नवे लेआउट स्थापून त्या ठिकाणी जास्तीत जास्त एफएसआय व ग्राउंड कव्हरेज देण्याचा उद्देश आखण्यात होता. मुंबई येथील भेंडीबाजार प्रोजेक्ट तसेच नवी दिल्ली येथील इस्ट किडवाई नगर नॅशनल बिल्डिंग कंट्रक्शन कार्पोरेशनच्या धर्तीवर हा पुनर्विकासाचे धोरण राबविले जाणार होते. मात्र यांमधील कोणताही प्रयोग यशस्वी झाला नाही असेच या स्मार्ट सिटी तून दिसून येत आहे.
पेन सिटी या प्रकल्पात तांत्रिक आणि ऑनलाईन सेवा वर विशेष भर देऊन नागरिकांना दर्जात्मक जीवनपद्धती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार होता. टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर यासारखे प्रकल्प यामध्ये सहभागी होणार होते. मात्र सध्या तरी नदी नाले हे ड्रेनेजच्या पाण्याने व्यापले गेले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचा आणि स्मार्ट सिटीचा कोणताही संबंध नसल्याचे दिसून येत आहे. यापुढे तरी प्रशासनाने पाण्याचा पुनर्वापर यासारखे प्रकल्प राबवून येथील जनतेची सोय करावी अशी मागणी होत आहे.
उपलब्ध शहरांमध्ये स्मार्ट सिटीचा आराखडा बनविताना उपलब्ध ठिकाणी अधिक कार्यक्षम आणि दयनीय जीवन पद्धती योग्य बनविण्याचा उद्देश यामध्ये आहे. शहरांच्या पाचशे एकर आकाराच्या मध्यवर्ती भागाचा समावेश असणार होता. नागरिकांच्या सल्ल्याने हा विभाग निवडून येथे असलेल्या पूर्वीच्या सेवांवर विचार करून आणि नागरिकांच्या सूचना वरून आदर करीत या भागातील विकासात्मक प्रकल्प राबविणार होते. मात्र तसे कोणतेच प्रयोग घडले नाहीत. त्यामुळे पुनर्विकासाचे धोरण राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटीचा बोजवारा उडाला आहे. यापुढे तरी याचा विचार करून नागरिकांची सोय करावी अशीच मागणी होत आहे.