Tuesday, November 19, 2024

/

बस वाहक – चालक पदासाठी अर्जाचे आवाहन

 belgaum

वायव्य परिवहन महामंडळाने चालक व वाहकांच्या रिक्त असलेल्या 2814 जागा भरून घेण्याचा निर्णय घेतला असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. भरतीच्या ऑनलाईन प्रक्रियेला गेल्या 10 डिसेंबरपासून प्रारंभ झाला असून ती येत्या 8 जानेवारी 2020 पर्यंत सुरू राहणार आहे.
उत्तर कर्नाटकातील सहा जिल्ह्यांमध्ये सेवा देणाऱ्या वायव्य परिवहन महामंडळाच्या ताब्यात नव्याने 400 बसेस दाखल होणार आहेत.

तथापि त्या चालविण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याने ही भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. नव्या 400 बसेसमधून बेळगाव जिल्ह्यासाठी 150 बस गाड्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. नव्या बसेसचा विचार केल्यास चालक व वाहक असे एकूण 300 जणांचे मनुष्यबळ केवळ बेळगाव विभागासाठी लागणार आहे. त्यातच विभागात रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वेगळीच आहे.

चिकोडी विभागातही 250-300 चालक व वाहक आवश्यक आहेत. परिवहन महामंडळ एकूण रिक्त जागांपैकी 2500 जागांवर चालक यासह आणखी राखीव चालक म्हणून 55 जागा भरून घेणार आहे. त्यामुळे एकूण चालकांची संख्या 2555 असणार आहे. याखेरीज चालक- वाहकांची 259 पदे भरली जाणार आहेत. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती मिनीबसमध्ये केली जाणार आहे. मिनी बसमध्ये चालकालाच वाहक म्हणून दुहेरी सेवा करावी लागणार आहे.

सदर भरती प्रक्रियासाठी 8 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाइन अर्ज आणि अधिक माहितीसाठी www.nwkrtc.in या संकेत स्थळाला भेट द्यावी असे कळविण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.