मागील महिन्यात येळ्ळूर येथे झालेल्या सीमा सत्याग्रहींच्या सत्कार कार्यक्रमा नंतर एकीकरण समितीचे नेते एकाच व्यासपीठावर दिसले निमित्य होत जुने बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या जनजागृती मेळाव्याचे…
शहर समिती अध्यक्ष किरण ठाकूर , माजी आमदार मनोहर किणेकर,मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी,सरचिटणीस मालोजी अष्टेकर,प्रकाश मरगाळे हे नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत .आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही गटातील नेते एकत्र आले खरे मात्र ते आपापल्या भाषणातून काय मुद्दे मांडणार…एकमेकांवर टीका करणार की एकीची भाषा करणार हे महत्वाचे आहे याकडे सीमा वासीयांच लक्ष लागून राहील आहे.
जुने बेळगाव येथील मेळावा एकीचा मेळावा म्हणून ओळखला जात होता सर्व नेत्यांना आमंत्रण होती त्यामुळे सगळे नेते एकत्र व्यासपीठावर आले आहेत.