Saturday, May 4, 2024

/

हलगा मच्छे बायपास काम बंद करा-जुने बेळगाव मेळाव्यात ठराव

 belgaum

2002 पासून हलगा जुने बेळगाव वडगाव येथील 150 एकरहून अधिक सुपीक जमीन बळकावून  हलगा मच्छे बायपास करण्याचा राष्ट्रीय महामार्ग आणि केंद्र सरकारने जो घाट घातला आहे तो बंद करा असा ठराव असा महत्वपूर्ण ठराव जुने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या मेळाव्यात मांडला.

June belgaum
मंगळवारी सायंकाळी जुने बेळगाव येथील कलमेश्वर मंदिराच्या आवारात झालेल्या मेळाव्यात मांडण्यात आला.जुने बेळगाव येथील समितीचे कार्यकर्ते संतोष शिवणगेकर यांनी ठराव मांडला.

गेली 62 वर्ष बेळगावातील जनता लोकशाही मार्गाने लढत असून बेळगाव शहरासह 865 खेडी महाराष्ट्रात सामील करा  असा देखील ठराव सर्वांनूमते संमत करण्यात आला.हजारो मराठी भाषिकांनी मेळाव्यास उपस्थिती लावली होती. हजारो मराठी भाषिकांनी टाळ्या वाजवून ठराव संमत केला.

 belgaum

कोल्हापूर   जिल्हा पंचायत सदस्य धैर्यशील माने ,  माजी सनदी अधिकारी दिनेश ओउळकर समिती अध्यक्ष किरण ठाकूर आमदार मनोहर किणेकर,मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी,सरचिटणीस मालोजी अष्टेकर,प्रकाश मरगाळे,वडगाव जुने बेळगाव भागातील नगरसेवक,समिती नेते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.