belgaum

विभागीय जनगणना प्रशिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : जनगणना हे राष्ट्रीय महत्त्वाचे काम असल्याने कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेत जबाबदारीने काम पूर्ण करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य जनगणना अधिकारी कार्तिक एम. यांनी केले.

महानगरपालिकेच्या परिषद सभागृहात सोमवारी जनगणना २०२७ अंतर्गत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विभागीय प्रशिक्षकांसाठी आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करून ते बोलत होते.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास योजनांसह अनेक महत्त्वपूर्ण कामांसाठी जनगणनेतील आकडेवारी मार्गदर्शक ठरत असल्याने या कामात सहभागी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घेऊन काम करावे. प्रशिक्षणादरम्यान काही शंका असल्यास प्रश्न विचारून त्यांचे निराकरण करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

 belgaum

नागरिकांशी सौजन्याने वागून अचूक आणि परिपूर्ण माहिती संकलित करावी तसेच निर्धारित कालावधीत जनगणनेचे काम पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

महानगरपालिकेचे महसूल विभागाचे उपायुक्त आणि शहर जनगणना अधिकारी डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी प्रात्यक्षिकांसह कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.

यावेळी जिल्हा जनगणना नोडल अधिकारी विपिन शर्मा, मुख्य प्रशिक्षक अंकिता एम., अनूप कनोज, विभागीय आयुक्त अनिल बोरगावी, राजशेखर नेगीन्हाळ, क्षेत्रीय प्रशिक्षक, महानगरपालिका जनगणना विभागाच्या झीनत मुल्ला, वसंत भरमण्णवर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.