Tuesday, April 30, 2024

/

जुने बेळगाव मेळाव्याने दिला एकीचा संदेश-

 belgaum

बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अश्या घोषणा,हजारो युवकांचा सहभाग,महिलांची लक्षणीय उपस्थिती आणि एकीकरण समितीच्या दोन्ही गटातील नेत्यांची एकाच व्यासपीठावर असलेली उपस्थिती सह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगाव शहरातील पहिल्या जागृती मेळाव्यास मराठी संस्कृतीचे दर्शन घडले.
जुने बेळगाव येथील कलमेश्वर मंदिराच्या आवारात एकीकरण समितीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी ए पी एम सी अध्यक्ष मनोहर होसुरकर होते तर व्यासपीठावर मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी,माजी आमदार मनोहर किणेकर, शहर समिती अध्यक्ष किरण ठाकूर, मालोजी अष्टेकर,प्रकाश मरगाळे,माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊलकर आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने,उपमहापौर मनोहर होसुरकर वडगाव भागातील नगरसेवक समितीचे जेष्ठ नेते उपस्थित होते.
लोकेच्छा दाखवण्यास समिती आमदार निवडून येणे गरजेचे- दिनेश ओऊळकर
आपल्यावर झालेला अन्याय हा राजकारणातून झालेला आहे आणि आपण सावध होणे गरजेचे आहे.राष्ट्रीय पक्षांनीच बेळगाव चं बेळगावी केलं आणि महानगरपालिकेवरचा भगवा काढला हे तरुणांना सांगा, आज आम्ही ६० ते ६५ वर्षे लढत आहोत, आमचा प्रश्न आज सुप्रीम कोर्टात आहे. असे सांगताना त्यांनी या दाव्याची माहिती माहिती दिली.आपलं आंदोलन लोकशाही तत्वाने सुरू आहे. बेळगावात मराठी साहित्य सम्मेलन झाले तेंव्हापासून सुरू असलेल्या एकंदर दाव्याची तांत्रिक माहिती आणि तत्व त्यांनी मांडले.सुप्रीम कोर्टात लोकेछा बळकट करण्यासाठी समितीचे आमदार निवडून येणे काळाची गरज आहे असे ते म्हणाले
शरद पवारांची सभा यशस्वी करा-दीपक दळवी
मराठी मनाचं एकच आमिष आहे हा प्रश्न सुटावा. आजवर तुमच्या ताकदीवर सीमाप्रश्नाचा लढा लढत आहे. याच लढ्याचा भाग म्हणून एक साधा कार्यकर्ता म्हणून लढतो आहे.जनतेने खाल्लेल्या खस्ता लक्षात येतात. शरद पवार तुम्हा आम्हा भेटण्यासाठी येत आहेत, कोणतीही अपेक्षा नसताना ज्यांची फक्त आम्हाला महाराष्ट्रात घेऊन जा ही एक मागाणी असतांना ते येत आहेत, त्या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहू, अशी ग्वाही दिली.

june bgm
प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडाव- मनोहर किणेकर
प्रत्येकाने आपल्या मनाशी एक खूणगाठ बांधली पाहिजे मी मराठी आहे, मी समितीचा आहे आणि मी समितीच्या पाठीशी उभा राहणार. त्या दृष्टीनं आम्ही सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीच्या साठी आम्ही आपापलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं तर दुसऱ्याला उपदेश करायची काय गरज राहणार नाही.
या सीमाभागात खरी गरज आहे आत्मपरिक्षणाची. माझं कर्तव्य काय? या हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मी या सीमाप्रश्नासाठी काय करायचं आहे?याचा विचार करून सीमाप्रश्नाच्या पाठीशी प्रामाणिक आणि खंबीरपणे उभे राहायचं ठरवलं तर या कर्नाटक सरकारच्या बापालाही आम्हाला इथे कोंडून ठेवता येणार नाही.आज आपण म्हणतो तरुण इकडे गेलेत तिकडे गेलेत पण मला या दहा वर्षांमध्ये असं अजिबात वाटलेलं नाही. आपण तरुणांपर्यंत पोचलेलो नाही, जेंव्हा जेंव्हा पोचलो त्या त्या वेळी तरुणांनी साथ दिली आहे. तालुक्यातल्या जन आंदोलनात हाक दिली की तरुणांनी साथ दिली आहे, मग त्या तरुणांचे विचारही आपण ऐकून घेतले पाहिजे तेव्हढा मोठेपणा आपण दाखवला पाहिजे. तुला काय कळतंय गप्प बस म्हटलो तर मात्र चालणार नाही. कुणाचीही हुकूमशाही इथे चालणार नाही.एक मराठा लाख मराठा प्रमाणे आता एक सीमावासीय लाख सीमावासीय म्हणण्याची गरज आहे. शरद पवार यांच्या माध्यमातून होणाऱ्या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून आमची शक्ती दाखवून देऊया.

old bgm 2

 belgaum

स्वार्थ बाजूला ठेऊन लढूया – किरण ठाकूर

जेंव्हा  भाषेवर अन्याय होतो तेंव्हा जनता पेटून उठते. याचे प्रत्यतर नेहमीच आले आहे. हा त्यागाचा लढा असून अनेकांनी त्याग केला आहे, आज जे तरुण या लढ्यात सहभागी होतात ये आमची शक्ती आहे.
अधुरा राहिलेला महाराष्ट्र पूर्ण करून देशाला बळकटी देण्यासाठी आम्ही एकसंघ आणि एकदिलाने लढूया. आज स्वार्थ ठेऊन जगण्याची वेळ संपली असून त्यागाने आणि प्रसंगी महिलांना पुढाकार देत येत्या निवडणुकीत विजयी होऊया.

स्वाभिमान गहाण ठेऊ नका -धैर्यशील माने

मराठी असण्याचा खरा स्वाभिमान हा महाराष्ट्रापेक्षा सीमावासीयामध्ये अधिक दिसून येत आहे. इथल्या माणसाने मागील ६२ वर्षांपासून सनदशीर मार्गाने हा सीमालढा सुरू ठेवला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर आमच्या तरुणाईला अनेक आमिषे दाखवून आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक साडी आणि कुकरसाठी आपला स्वाभिमान गहाण ठेऊ नका.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.