धबधब्यात बुडून विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू

0
11
Tilari
 belgaum

तिलारी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या अडक्याच्या वझर धबधब्यांमध्ये बुडवून बेळगावच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी घडली.

हार्दिक प्रवीण परमार (वय 22, मूळ रा. गोवा, सध्या रा. एस. जी. बाळेकुंद्री अभियांत्रिकी महाविद्यालय, शिवबसवनगर, बेळगाव) असे धबधब्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नांव आहे. मिळालेली माहितीनुसार काल रविवारी महाविद्यालयाला सुट्टी असल्याने हार्दिक हा आपल्या एका मित्रांसमवेत तिलारी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या अडक्याच्या वझर धबधब्यात होण्यासाठी गेला होता.

पोहण्यासाठी हार्दिकने पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध मोहीम राबवून काल सायंकाळी मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर ही माहिती मृत हार्दिकच्या कुटुंबियांना कळविण्यात आली.Tilari

 belgaum

हार्दिक परमार हा शहरातील शिवबसवनगर येथील एस. जी. बाळेकुंद्री अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 8 व्या सेमिस्टरमध्ये शिकत होता.

आता गोवा येथील हार्दिकचे नातेवाईक आल्यानंतर आज मृतदेहावर शवचिकित्सा करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. तिलारी धरणात विद्यार्थी बुडाल्याची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास हंडा व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.