बेळगावची ऐतिहासिक शतकपूर्ती शिवजयंती आणि शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी शहराचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच मिरवणूक उद्घाटनासाठी त्यांना निमंत्रीत केले.
शहरात...
बेळगाव शहरातील सार्वजनिक वाचनालयातर्फे पुस्तक दिना निमित्त आयोजित विशेष कार्यक्रम नुकताच उस्फुर्त प्रतिसादात पार पडला. या कार्यक्रमांतर्गत वाचनालयाचा सातत्याने लाभ घेणाऱ्या वाचकांच्या प्रतिनिधींचा सन्मान करून त्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले.
सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये आयोजित सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर गोविंदराव...
बेळगाव तालुक्यातील हालगा गावची होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिने बेंगलोर येथे आयोजित अखिल भारतीय पातळीवरील '2 ऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स -2021' क्रीडा महोत्सवामध्ये आज मंगळवारी वेटलिफ्टिंगच्या स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात सुवर्णपदक हस्तगत केले आहे....
सुळगा -येळ्ळूर शिवारामध्ये काल सोमवारी सायंकाळी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच खून करून सदर तरुणाचा मृतदेह शिवारात आणून टाकल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.
सुळगा -येळ्ळूर शिवारामध्ये काल सोमवारी सायंकाळी सुमारे 25 ते 30...
बेळगाव पोलीस खात्यातील तीन एनकाऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या शंकर मारीहाळ यांची पोलीस अधीक्षकपदी (एसपी) पदोन्नती झाली आहे.
शंकर मारीहाळ यांची हेस्कॉम व्हीजिलेंस स्कोड पोलीस अधीक्षकपदी पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशावरून सरकारची सचिव राजेश सुळीकेरी यांनी हा...
बेळगावची यंदाची शतकपूर्ती शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस खात्याकडून बंदोबस्ताचे नियोजन केले जात असून यावेळी चित्ररथ मिरवणुकीवर ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवली जाणार आहे. या पद्धतीने मिरवणुकीतील प्रत्येक घडामोडीवर पोलीस खात्याची बारीक नजर असणार आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन...
न्यायालयाचा आदेश डावलून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उभ्या पिकात यंत्रसामग्री घुसून पुन्हा हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे हाती घेण्यात आल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी या कामाला जोरदार विरोध केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यामुळे महामार्ग प्राधिकरण विरुद्ध शेतकरी...
बनावट कागदपत्रे तयार करून शेतजमिनीची बिगरशेती (एनए) केल्याच्या आरोपावरून बेळगावचे तत्कालीन डीसी अर्थात जिल्हाधिकारी, तहसीलदार, बुडा आयुक्त कार्यालयातील अधिकारी यांच्यासह जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ...