पोलिसांकडून विनाकारण अर्वाच्य शिवीगाळ करून त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करत संताप मुस्लिम समुदायाच्या लोकांनी एपीएमसी पोलिस ठाण्याला घेराव घालून निदर्शने केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार काल गुरुवारी रात्री कांही पोलिसांनी अंजनेयनगर मुख्य रस्त्यावर असलेली लहान लहान...
बेळगाव विमानतळ येथे आज शुक्रवारी पार पडलेल्या विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत सुरु असलेल्या विमानसेवा, विकास कामे आदींचा आढावा घेण्यात आला.
बेळगाव विमानतळाच्या कार्यालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी खासदार मंगला अंगडी यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ सल्लागार समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत...
आगामी श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी आज शुक्रवारी दुपारी श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
बेळगाव शिवजयंतीची चित्ररथ मिरवणूक येत्या 4 मे रोजी काढण्यात येणार आहे. सदर मिरवणूक कोणताही अडथळा...
सरकारी कार्यालयं, रस्ते, बसेस आदींच्या नामफलकांमध्ये मराठी भाषेचा अंतर्भाव करावा या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सुरू ठेवलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा प्रशासनासह बेळगाव महापालिकेकडून कालपासून शहरातील रस्त्यांचे नामफलक मराठी भाषेत उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनासह स्मार्ट...
नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातील बेळगावसह 15 रेल्वेस्थानकांवर 'एक स्टेशन एक उत्पादन' हा आगळा उपक्रम राबविला जाणार असून या उपक्रमांतर्गत स्थानिकांना स्वतःची उत्पादने विकता येणार आहेत. यासाठी स्थानिक कारागीर विणकर शेतकरी आदींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
नैऋत्य रेल्वेच्या 'एक स्टेशन एक...
कर्नाटक शिक्षण विभागाने 2022 -23 या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या शैक्षणिक वर्षात 270 दिवस शैक्षणिक कामासाठी दिले असून यंदा दसऱ्याला 14 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.
कोरोना संसर्गनंतर 3 वर्षे पूर्ण काळ वर्ग झाले नाहीत. परंतु या...
राज्यात पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या अर्थात बारावीच्या परीक्षेला आज शुक्रवारी 22 एप्रिलपासून प्रारंभ झाला असून परीक्षा सुरळीत होण्यासाठी पदवीपूर्व शिक्षण खात्याने तयारी पूर्ण केली आहे. हिजाब घालून येणाऱ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नसल्याचेही पदवीपूर्व खात्याने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने दहावी...
बेळगाव आणि गोव्याचे नाते फार जुने आहे .बेळगावातील नागरिक गोव्यात पर्यटनासाठी येतात आणि गोव्याचे नागरिक खरेदीच्या निमित्ताने प्रत्येक आठवड्यातील दोन दिवस बेळगावला हमखास भेट देतात.
याच नात्यातून बेळगाव आणि महाराष्ट्र वासियांना पर्यटनाची चांगली संधी गोव्यात उपलब्ध करून देण्याची ग्वाही गोवा...
बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे येत्या 24 एप्रिल रोजी भारत, इराण आणि जॉर्जिया या आंतरराष्ट्रीय भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असून हे मैदान यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत.
कोल्हापूरच्या खासबाग मैदान आखाड्यानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नामवंत आखाडा...
लोंढा ते मिरज या दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील कांही रेल्वे रद्द तर कांही रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तरी प्रवाशांनी पुढील कांही दिवसांसाठी संबंधित रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन...