बेळगाव तालुक्यातील मन्नूर गावची कन्या युवा नेमबाज अक्षता चौगुले हिचा कौतुक मुंबईत झालं आहे.
सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनतर्फे वामनराव पै यांच्या धर्मपत्नी मातृतुल्य सौ.शारदा माईंच्या 96व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई येथील योगी सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात बेळगांव...
सकल मराठा समाज बेळगावच्या सदस्यांनी काल रविवारी कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील मराठा समाजाच्या रामनाथगिरी (समाधी) मठाचे मठाधिपती जगतगुरु राष्ट्रीय धर्माचार्य श्री श्री भगवानगीरी महाराज यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्याद्वारे त्यांना 'गुरुवंदना' कार्यक्रमासाठी निमंत्रित केले.
श्री श्री भगवानगीरी महाराज...
बेळगाव शहर परिसरा सह ग्रामीण भागात सध्या यात्रोत्सव आणि विवाह समारंभाची धूम सुरू आहे. मात्र यानिमित्ताने डॉल्बीच्या केला जाणारा दणदणाट चिंतेचा विषय बनू लागला आहे. यासाठी डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात यात्रोत्सव...
बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून या कुत्र्यांचा बंदोबस्त करता येत नसेल तर त्यांची नसबंदी करून त्यांना रॅबीज इंजेक्शन द्यावे, अशी मागणी कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड येथील सामाजिक कार्यकर्ते...
गेल्या अनेक दिवसांची मागणी असलेल्या गुंडेवाडी-चमकेरी रस्ताकामाचा नुकताच प्रारंभ झाला. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्या हस्ते कुदळ मारुन याचे उद्घाटन झाले.
सदरचा रस्ता बराच खचला होता. त्यामुळे येथून ये-जा करणार्या जनतेची अडचण होत होती. याचा विचार करून...
नवी दिल्लीसह उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोना महामारीची ताजी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सोमवारी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.
उच्चस्तरीय बैठकीमध्ये कांही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले...
महाद्वार रोड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि महापालिकेचे स्वच्छता पर्यवेक्षक संजय पाटील यांनी रक्तदान करून आज आपला वाढदिवस साजरा केला. रक्तदान करण्याची पाटील यांची ही 117 वी वेळ आहे.
बेळगाव महापालिकेच्या स्वच्छता विभागात पर्यवेक्षक असणारे महाद्वार रोड येथील संजय रामचंद्र पाटील...
चन्नम्मानगर मुख्य रस्त्यावर राणा प्रताप रोड कॉर्नर येथील देशपांडे बंगल्यासमोरील एक निष्पर्ण वाळवी लागलेल्या कधीही कोसळेल अशा धोकादायक अवस्थेत असलेला वृक्ष तात्काळ हटविण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
क्लब रोड येथे जुनाट वृक्ष कोसळून एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्यामुळे शहरातील...
राज्यात नवीन 19 ईएसआय रुग्णालयं सुरू करण्याचा प्रस्ताव असून त्यापैकी एक हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी येथे असणार आहे, अशी माहिती कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी दिली आहे.
राज्यातील तालुक्यात विशेष करून ग्रामीण भागातील ईएसआय रुग्णालयं सुरू करण्याची योजना आहे. त्यासाठी राज्यातील...
बेळगाव शहरात 'शेअरिंग बायसिकल' या नागरिकांना अत्यंत माफक दरात भाड्याने सायकल मिळण्याच्या नव्या सेवेला लवकरच प्रारंभ होणार आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या माध्यमातून 'याना' या ॲपच्या सहाय्याने नागरिकांसाठी एका ठिकाणाहून सायकल घेऊन काम आटोपताच ती दुसऱ्या पॉइंटला ठेवण्याची व्यवस्था करण्यात...