Friday, April 19, 2024

/

यासाठी झाले ‘अक्षताचे कौतुक’

 belgaum

बेळगाव तालुक्यातील मन्नूर गावची कन्या युवा नेमबाज अक्षता चौगुले हिचा कौतुक मुंबईत झालं आहे.

सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनतर्फे वामनराव पै यांच्या धर्मपत्नी मातृतुल्य सौ.शारदा माईंच्या 96व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई येथील योगी सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात बेळगांव येथील युवा नेमबाज खेळाडू कुमारी अक्षता विश्वनाथ चौगुले हिला सन्मानित करण्यात आले.

अक्षताने 2013 साली दिल्ली येथे झालेल्या ऑल इंडिया सैनिक कॅम्प मध्ये स्नॅप या प्रकारात सुवर्ण पदक पटकावत नेमबाजीत राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करत सुवर्ण पदक मिळवले होते.सद्गुरुंचे सुपुत्र .प्रल्हाद वामनराव पै यांच्या हस्ते अक्षताचा सत्कार करण्यात आला.Akshta

 belgaum

अक्षता ही 2012 पासून जीवन विद्येचे तत्वज्ञान वापरून वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवत आहे .2017 साली आसनसोल कोलकात्ता इथे नॅशनल रायफल शूटिंग मध्ये भाग घेतला होता. त्यानंतर 2018 साली दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कॅम्पमध्ये तिचे कर्नाटक व गोवा डायरेक्टरेट ल तर्फे सिलेक्शन झालं होते यावेळी तिला पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली होती.

आता ती कोल्हापूर येथे रायफल शूटिंग चे प्रशिक्षण घेत आहे.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.