Friday, April 26, 2024

/

रक्तदान करून ‘यांनी’ साजरा केला वाढदिवस

 belgaum

महाद्वार रोड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि महापालिकेचे स्वच्छता पर्यवेक्षक संजय पाटील यांनी रक्तदान करून आज आपला वाढदिवस साजरा केला. रक्तदान करण्याची पाटील यांची ही 117 वी वेळ आहे.

बेळगाव महापालिकेच्या स्वच्छता विभागात पर्यवेक्षक असणारे महाद्वार रोड येथील संजय रामचंद्र पाटील हे सामाजिक कार्याबरोबरच रक्तदानाच्या कार्यातही नेहमी आघाडीवर असतात.Sanjay patil

वयाच्या सतरा-अठरा वर्षापासून रक्तदान करणाऱ्या संजय पाटील यांनी आतापर्यंत 117 वेळा रक्तदान केले आहे. दरवर्षी स्वतःच्या वाढदिवसादिवशी ते आवर्जून रक्तदान करतात हे विशेष होय.

 belgaum

त्यानुसार आज सोमवारी आपल्या 52 व्या जन्मदिनानिमित्त त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान केले. त्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

रक्तदाता युवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.