Thursday, April 25, 2024

/

श्रीमंत पाटील यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी 25 लाख

 belgaum

गेल्या अनेक दिवसांची मागणी असलेल्या गुंडेवाडी-चमकेरी रस्ताकामाचा नुकताच प्रारंभ झाला. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्या हस्ते कुदळ मारुन याचे उद्घाटन झाले.
सदरचा रस्ता बराच खचला होता. त्यामुळे येथून ये-जा करणार्‍या जनतेची अडचण होत होती. याचा विचार करून आ. श्रीमंत पाटील यांनी 25 लाखांचा विशेष निधी यासाठी मंजूर करून घेतला.

त्याच्या कामाला नुकताच प्रारंभ झाला. यावेळी आ. पाटील म्हणाले, ग्रामीण भागाला जोडणार्‍या सर्व रस्त्यांचा विकास व्हावा, ही आपली पूर्वीपासूनची इच्छा आहे. रस्ते जोडले तर संपर्क वाढेल, तो वाढला तर दळणवळण वाढणार आहे, साहजिकच याचा रोजगार व व्यापारावर परिणाम होऊन ग्रामीण भागाचा विकास होत असतो. त्यामुळे ग्रामीण रस्ते तालुक्याला जोडण्यासाठी आपला यापुढेही सातत्याने प्रयत्न राहील.

अनेक दिवसांची मागणी असलेला हा रस्ता सुरू झाल्याने येथील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी स्थानिक नागरिक शिवानंद गोलभावी, सिद्राय तेली, आबासाब चव्हाण, आप्पाण्णा मजगावकर, रामगौडा पाटील, कलगौडा पाटील, एम. डी. जाधव, संभा वीर, पापाचंद बनजवाड, विकी कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर उपस्थित होते.Shrimant

 belgaum

आ. श्रीमंत पाटील यांचा आराधना महोत्सवात सहभाग
अथणी:
उगार बुद्रूक येथील ग्रामदेवता पद्मावती मंदिरात नुकतीच महामंगल आराधना महोत्सवाला सुरवात झाली. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी सहभाग घेऊन देवीचे दर्शन व महास्वामींचा आशिर्वाद घेतला.

हा आराधना महोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. या महोत्सवात श्रीक्षेत्र सोंदा मठाचे जगद्गुरू अकलंकेसरी स्वस्तिश्री भट्टाकलंक भट्टारक स्वामी, श्रीक्षेत्र कंबदहळ्ळी मठाचे भानुकिर्ती भट्टारक स्वामी, अथणी पीएलडी बँकेचे अध्यक्ष व महोत्सवाचे संयोजक शीतलगौडा पाटील, उगार बीके ग्रा. पं. अध्यक्ष भुजगौडा पाटील, प्रतिष्ठीत नागरिक मनोज कुसनाळे, आप्पासाब चौगुला, जयपाल यरंडोले, वृषभ पाटील, विजय शिंदे, दिपक नंदगाव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.